फेक व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक

फेक व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक

व्हॉट्सअॅप (प्रातिनिधीक फोटो)

हैदराबादमध्ये सोशल मीडियावर फेक व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. शहरात गुन्हेगारी घटना घडविण्यासाठी काही टोळ्या आल्या आहेत, अशा आशयाचे व्हिडिओद्वारे दाखवण्यात येत होते. तसेच सामान्य लोकांनी मनोरूग्ण आणि भिकाऱ्यांवर हल्ला करावा, यासाठी हे व्हिडिओ प्रवृत्त करत होते. रचकोंडा पोलीस आयुक्ताच्या मते, सोशल मीडियावर बनावट व्हिडिओ आणि ऑडिओ व्हायरल करणारे दोन विद्यार्थी दोषी आढळले आहेत. या बनावट व्हिडिओद्वारे ते मनोरूग्ण व भिकाऱ्यावर हल्ला करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करत होते. पोलिसांनी या दोन्ही विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन जप्त केले आहेत.

पोलीस या घटनेचा आणखी पाठपुरावा करत आहेत. हा फेक व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचला याची चौकशीही पोलीस करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून दक्षिणेतील काही राज्यात गुन्हेगार असल्याच्या संशयावरुन लोकांना मारहाण केली जात आहे. तेलंगानामध्ये २२ मे पासून अशाच घटनांमध्ये आतापर्यंत तीन लोकांची हत्या करण्यात आली आहे.

First Published on: May 28, 2018 2:25 PM
Exit mobile version