जत्रेसाठी आलेले दोन पाळणा व्यावसायिक लॉकडाऊनमध्ये अडकले 

जत्रेसाठी आलेले दोन पाळणा व्यावसायिक लॉकडाऊनमध्ये अडकले 

दोन पाळणा व्यावसायिक लॉक डाऊन मध्ये अडकले

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे गुढीपाडव्यादिवशी “बोडवा” म्हणून मोठी जत्रा भरली जाते. परंतु सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पडघा येथील गुढीपाडव्याची जत्रा देखील यावर्षी रद्द करण्यात आली आहे. परंतु गुढीपाडव्याच्या काही दिवसांपूर्वीच बाहेरून पाळणे व्यावसायिक पडघ्यात येत असतात. असेच दोन पाळणे व्यावसायिक आपल्या पाळण्याच्या सामानासहित १८ तारखेपासून पडघा येथे अडकले आहेत. हे पाळणीवाले कल्याण येथे राहत असून गोपालकुमार गुप्ता, महादेव उराव अशी त्यांची नावे आहेत. सद्या ते उघड्यावरच राहत असून पोटाला मिळेल ते खात आहेत. पडघा ते कल्याण २३ किलोमीटरचा अंतर असून सुद्धा संचारबंदीच्या व लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडता येत नाही. त्यामुळे उन्हातानातच बिकट परिस्थितीत त्यांना सध्या राहावे लागत आहेत.
दरम्यान आम्ही १८ तारखेपासून पडघ्यात आलो असून आम्ही उघड्यावरच राहत असून उन्हाचे चटके सोसत आहोत, जे मिळेल ते खाऊन पोट आम्ही भरत आहोत. अशा काळात कुठ जाऊ शकत नाही. लॉकडाऊनमुळे हे मोठे संकट आमच्यावर ओढवले आहे, अशी प्रतिक्रिया पाळणाव्यावसायिक गोपालकुमार गुप्ता व महादेव उराव यांनी दिली आहे.
First Published on: March 29, 2020 5:53 PM
Exit mobile version