बोगस विक्रीप्रकरणी दोन व्यापार्‍यांना अटक

बोगस विक्रीप्रकरणी दोन व्यापार्‍यांना अटक

संशयातून प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकराला जन्मठेप

नामांकित कंपन्याच्या बोगस घड्याळांच्या विक्रीप्रकरणी दोन व्यापार्‍यांना बुधवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी काळबादेवी परिसरातून अटक केली. हितेश प्रेमजी गडा आणि कुंजन रमेश गडा अशी या दोन व्यापार्‍यांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी विविध नामांकित कंपनीची सुमारे साडेआठ हजार बोगस घड्याळे जप्त केली असून या घड्याळांची किंमत एक कोटी चाळीस लाख रुपये असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने मंगळवार 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी बोगस घड्याळाच्या विक्री करणार्‍या एका टोळीचा पर्दाफाश करुन त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा घड्याळाचा साठा जप्त केला होता.

ही मोहीम सुरू असतानाच काळबादेवी येथील शेख मेमन स्ट्रिट, सुतार चाळीत काहीजण अशाच प्रकारे विविध नामांकित कंपनीच्या घड्याळाची विक्री करीत असल्याची माहिती युनिट चारच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकाने सुतार चाळीतील रियल टाईम शॉप आणि डिवाईन कलेक्शन शॉप या दोन दुकानात छापा टाकला होता. या दोन्ही दुकानातून पोलिसांनी विविध बाराहून नामांकित कंपनीच्या बोगस घड्याळाचा साठा जप्त केला. 225 विविध बॉक्समध्ये ठेवण्यात आलेली 8 हजार 419 बोगस घड्याळे या कारवाईत पोलिसांनी जप्त केले असून त्याची किंमत एक कोटी चाळीस लाख रुपये आहे. याच गुन्ह्यांत नंतर हितेश गडा आणि कुंजन गडा या दोन व्यापार्‍यांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना गुरुवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

First Published on: October 18, 2019 1:38 AM
Exit mobile version