दुचाकी चोरी करणारी टोळी अटकेत

दुचाकी चोरी करणारी टोळी अटकेत

मोटारसायकल चोरणाऱ्या अल्पवयीन सह दोन चोरट्यांना  पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात एक जण पळून गेला आहे. अटक करण्यात आलेल्या चोरट्याकडून पोलिसांनी ५ मोटारसायकल जप्त केल्या आहेत.  ३१ जानेवारी २०२२ रोजी मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  या प्रकरणाचा तपास सुरू असताना चोरटे चोरीची मोटारसायकल घेऊन  कल्याण – कर्जत महामार्गावर असलेल्या उल्हासनगर ३ येथील  साईबाबा मंदिराजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांना मिळाली होती.

माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचून या अल्पवयीन चोरट्याला पकडले. मात्र यावेळी त्याचा साथीदार पळून गेला. अल्पवयीन आरोपीची चौकशी केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याचे साथीदार आरोपी करण अनिल मिश्रा आणि वसीम आलमगीर शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त केली.

आरोपींची चौकशी केली असता त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून २ मोटारसायकली आणि बदलापूर पश्चिम हद्दीतून २ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे.  ज्याची किंमत ४ लाख ३० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.  पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.  आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची  पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर कोकरे करीत आहेत.

अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहायक पोलिस आयुक्त सातव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, पोलिस निरीक्षक सुहास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर कोकरे, पोलिस कर्मचारी विजय जीरा, प्रवीण पाटील, डॉ. दीपक पाटील, संजय पालवे, अरविंद पवार, बाबासाहेब ढाकणे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

First Published on: February 2, 2022 9:43 PM
Exit mobile version