राज ठाकरेंच्या ईडी चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही – उद्धव ठाकरे

राज ठाकरेंच्या ईडी चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणी ईडीने नोटीस बजावली असून उद्या, २२ ऑगस्ट रोजी चौकशीकरता बोलावले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ सर्व मनसैनिक एकवटे असतानाच आता त्यांचे चुलत बंधू आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरेंना या प्रकरणी क्लिन चिट दिली आहे. ईडीमार्फत होणाऱ्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. रश्मी बागल आणि निर्मला गावित यांनी आज, बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर हा प्रवेशाचा कार्यक्रम उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या चौकशीसंबंधी हे सूचक वक्तव्य केले.

हेवाचा – राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवरून मनसेच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची आत्महत्या

चुलत भावांमधील एकोपा दिसला 

चुलत भावांनी एकमेकांच्या पाठेमागे उभे राहण्याची ही काही पहिलीच वेळा नाही. यापूर्वीही उद्धव ठाकरे वांद्रे येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असताना राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली होती. इतकेच नव्हे तर लीलावतीतून डिस्चार्ज मिळाळ्यानंतर उद्धव ठाकरे घरी जाताना राज यांनी त्यांच्या गाडीचे सारथ्य केले होते. आता राज ठाकरे अडचणीत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची पाठराखण केली आहे.

हेही वाचा – शांत रहा !,राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश

First Published on: August 21, 2019 12:37 PM
Exit mobile version