ई-सिगारेटवर बंदी घालण्याचे विद्यापीठाचे कॉलेजांना आदेश

ई-सिगारेटवर बंदी घालण्याचे विद्यापीठाचे कॉलेजांना आदेश

E-Cigarettes

ई – सिगारेटवर राज्य सरकारकडून बंदी आणणारे अध्यादेश जारी करण्यात आले आहे. या अध्यादेशावर मुंबई विद्यापीठाने अंमलबजावणी करत सलंग्न कॉलेजांना ई-सिगारेट बंदीचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबरच ई – सिगारेटवर बंदीसाठी कॉलेजांनी विविध उपक्रम राबवण्याच्या सूचनाही मुंबई विद्यापीठानी दिल्या आहेत.

इलेक्ट्रॉनिक निकोटिन डिलिव्हरी सिस्टीम अंतर्गत (ईएनडीएस) असलेल्या ई सिगारेट, ई हुक्कासारख्या धुम्रपानाच्या साधनांचा तरुणांकडून मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे देशातील 161 डॉक्टरांनी ई सिगारेटवर बंदी घालण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद मोदी यांना पत्र लिहिले होते. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने 4 ऑक्टोबरला सर्व शैक्षणिक संस्थांना ई सिगारेटवर बंदी घालण्याबाबत पत्र पाठवण्यात आले. त्याचप्रमाणे ई सिगारेटची विक्री आणि जाहिरातवर बंदी घालण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने एक अध्यादेश काढण्यात आले. या अध्यादेशाची राज्यातील कॉलेजांनी कडक अमंलबजावणी करण्याचे आदेश दिले. या आदेशाची मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाने तातडीने अंमलबजावणी करत सर्व कॉलेजांना ई-सिगारेटवर बंदी घालण्याची अधिसुचना काढली आहे.

ई सिगारेटने काय होते?
ई सिगारेटमुळे कॅन्सर, हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार, कोलेस्टरॉल, फुफ्फुसाचे आजार (सीओपीडी), दमा, अस्थमा, किडनी खराब होणे, अ‍ॅसेडिटी, आतड्यांचे आजार, फुफ्फुस, तोंडाचे कॅन्सर होतात. ई – सिगारेटमध्येही तंबाखूचा समावेश असल्याने हे सर्व आजार होत असल्याचे अनेक संशोधनामध्ये स्पष्ट झाले आहे.

First Published on: October 17, 2019 1:42 AM
Exit mobile version