Video : कुर्ल्यात गोदामाला भीषण आग!

Video : कुर्ल्यात गोदामाला भीषण आग!

कुर्ल्यात आग

कुर्ल्यात मानखुर्द- घाटकोपर लिंक रोडवरील एका गोदामाला पहाटे मोठी आग लागली. मंडला परिसरातील झोपडपट्टीत ही आग लागली आहे.  अग्निशामनलदलाच्या ६ गाड्या आणि ३ वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. झोपडपट्टीतील केमिरल, प्लॅस्टिक, भंगाराच्या गोजामाला आग लागली आहे.  या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. भीषण आगीमुळे गोदामं जळून खाक झाली आहेत. इोपडपट्टीपरिसरातील नागरिकांना सुरक्षीत स्थळी हालवण्यात आलं आहे.

या गोडाऊनमध्ये कच्चा माल, तेलाचे जूने ड्रम होते. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणावर भडकली. साधारण १५ हजार स्क्वेअर फीट परिसरात आग पसरली. आग मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे संपूर्ण परिसरात धुराचं साम्राज्य पसरले. या परिसरात दाटीवाटीने गोदामं असल्याने आग वेगाने पसरली आणि आगीत गोदामं जळून खाक झाली. लाखोंचे नुकसान झाले आहे.

First Published on: June 23, 2020 7:45 AM
Exit mobile version