लोकसंख्येपेक्षा शहरीकरण वेगाने

लोकसंख्येपेक्षा शहरीकरण वेगाने

IIT mumbai study

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) भागात गेल्या चार दशकांमध्ये लोकसंख्या वाढीच्या तुलनेत बिल्ट अप एरियामध्ये अधिक वाढ झाली, असा अहवाल समोर आला आहे. आयआयटी मुंबईच्या एका प्राध्यापकाने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

आयआयटी मुंबईच्या अभ्यासात शहरातील झालेली वाढ अभ्यासण्यासाठी गेल्या चार दशकांमधील सॅटेलाईट इमेजचा वापर करण्यात आला आहे. शहरी भागातील वाढ या अभ्यासातून समोर आली आहे. सन १९७२ ते २०११ या कालावधीतील सॅटेलाईट इमेजचा वापर करून हा अभ्यासपूर्ण करण्यात आला आहे. अभ्यासलेल्या कालावधीत बिल्ट अप एरिया हा ४.५ पटीने वाढला. बिल्ट अप एरियामध्ये झालेली वाढ ही २३४ चौरस किलोमीटर ते १०५६ चौरस किलोमीटर इतकी होती. या काळात लोकसंख्या तीन पटीने वाढली. अभ्यासादरम्यान संशोधकाने जुन्या संग्रही असलेल्या लॅण्डसॅट इमेजेसचा वापर केला. अभ्यासासाठी मुंबई शहर, उपनगर, रायगड आणि ठाणे या भागाचा समावेश करण्यात आला होता. अभ्यासासाठी ऑब्जेक्ट बेस इमेज एनेलिसीसचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे मुंबई शहरात झालेली वाढ अभ्यासण्यासाठी मदत झाली. शहरीकरणातील विविध घटकांचा अभ्यास करणे त्यामुळे शक्य झाले. आयआयटी मुंबईतील प्राध्यापक शिरीष गेडाम यांनी आपल्या एका विद्यार्थीनीच्या अभ्यासाच्या निमित्ताने या प्रकल्पावर काम करण्यासाठी सुरूवात केली होती.

शहरीकरणात झालेल्या वाढीनुसार वसई आणि विरार यांसारख्या उत्तर भागात तर पूर्व भागात भिवंडीपर्यंत मध्य रेल्वेच्या महामार्गालगत वाढ झालेली माहिती अभ्यासादरम्यान समोर आली आहे. ठाणे खाडी ते नवी मुंबई अशी तिसर्‍या बाजुलाही मोठ्या प्रमाणात शहरीकरणात वाढ झाली आहे. वाढत्या शहरीकरणासोबतच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, माथेरान आणि कर्नाळा पक्षी अभयारण्य याठिकाणच्या इको सेन्सेटीव्ह झोनला फटका बसू नये यासाठीची खबरदारी घेण्याचे संशोधन अहवालात नमुद करण्यात आले आहे.

First Published on: September 4, 2019 2:12 AM
Exit mobile version