अभिनेता नवजेत हुंडल यांचे निधन

अभिनेता नवजेत हुंडल यांचे निधन

अभिनेता नवजेत हुंडल यांचे निधन

भारताच्या सूडाची कथा आणि अभिनेता विक्की कौशल याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटात गृहमंत्र्यांची भूमिका साकारणारे अभिनेता नवतेज हुंडल यांचे सोमवार दि. ८ रोजी निधन झाले आहे. त्यांच्या मागे कुटुंबामध्ये पत्नी आणि दोन मुल आहेत. हुंडल यांच्यावर आज दि. १० रोजी मुंबई येथील जोगेश्वरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. हुंडल यांचा मृत्यू कशामुळे झाला याचे निदान असू झाले नाही आहे. मृत्यू संबंधीत कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही. ‘सिन्टा’ या संघटनेने हुंडल यांच्या निधनाची माहिती दिली आहे. या संघटनेने ट्विट करून या संबंधीत माहिती दिली.

या चित्रपटामध्येही केली कामे

सिन्टा या संघटनेने अभिनेता नवतेज हुंडल यांच्या निधनासंबंधी शोक व्यक्त केले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये ‘मृतात्म्यांस शांती लाभो’ असा संदेश लिहिला आहे. तसेत ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाच्या आधी त्यांनी ‘संजय दत्त की खलनायतक’, ‘तेरे मेरे सपने’ आणि ‘द विस्परर्स’ अशा चित्रपटामध्ये कामे केली आहेत.

First Published on: April 10, 2019 4:16 PM
Exit mobile version