अवघ्या सहा महिन्यात उर्मिला मातोंडकरने सोडला काँग्रेसचा ‘हात’

अवघ्या सहा महिन्यात उर्मिला मातोंडकरने सोडला काँग्रेसचा ‘हात’

उर्मिला मातोंडकर

सिनेकलाकार उर्मिला मातोंडर हिने काँग्रेस पक्षातील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उर्मिला मातोंडकर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. उत्तर मुंबई या मतदारसंघातून उर्मिलाला काँग्रेसने उमेदवारीदेखील दिली होती. मात्र पुन्हा एकदा त्या जागेवरून भाजपचे गोपाळ शेट्टी यांची खासदारपदी वर्णी लागली. त्यानंतरही उर्मिलाने काँग्रेसची साथ सोडणार नसल्याचे म्हटले होते. परंतू आज, मंगळवारी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण हा राजीनामा देत असल्याचे तिने म्हटले आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या उपस्थितीत उर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती.

 

First Published on: September 10, 2019 3:10 PM
Exit mobile version