अग्निशमन दलामध्ये ९२७ पदे रिक्त!

अग्निशमन दलामध्ये ९२७ पदे रिक्त!

मुंबई अग्निशमन दल

बृहन्मुंबई महानगरपालिका ही आशियातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. याशिवाय मुंबई शहारही सर्वात सुरक्षित शहर मानले जाते. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेला मुंबईकरांच्या जीवाची काहीच किंमत नसल्याचे चित्र दिसत आहे. कारण गेल्या काही वर्षांत मुबंई हे अपघाताचे शहर बनले आहे. आकडेवारीनुसार गेल्या साडे पाच वर्षांत मुंबईत तब्बल ४९ हजार १७९ आपत्कालीन दुर्घटना घडल्या असून त्यामध्ये ९८७ लोकांची बळी गेला आहे तर ३ हजार ६६ लोक जखमी झाले आहे. मुंबईत कोणतीही आपत्कालीन दुर्घटना घडली तर अशावेळी बचाव कार्यासाठी महापालिकेने मुंबई अग्निशमन दलाची वेगळी स्थपना केली आहे. मात्र, सध्या मुंबई अग्निशमन दलामध्ये मंजूर अधिकाऱ्यांसाठी फक्त ३ हजार ८०७ मंजूर अधिकारी/कर्मचाऱ्यांचा जागा आहेत. मात्र, त्यापैकी केवळ २ हजार ८८० पद भरलेली आहेत. त्यामुळे सध्या ९२७ पदे रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते तथा अधिकार फाउन्डेशचे अध्यक्ष शकील अहमद शेख यांनी दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे किती अधिकारी/कर्मचारी मंजूर करण्यात आले आहेत तसंच सध्या कितीजण कार्यरत आहेत आणि किती पदे रिक्त आहेत याबाबत माहिती विचारली होती. सदर माहिती संदर्भात मुंबई अग्निशमन दलाचे जनमाहिती अधिकरी तथा विभागीय अग्निशमन अधिकारी एस.डी. सावंत यांनी शेख यांना माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती दिली. याच माहितीनुसार, सध्या मुंबई अग्निशमन दलामध्ये एकूण ९२७ पदे रिक्त आहे. मंजूर पदाचे माहिती खलीलप्रमाणे आहे.

अग्निशमन दलातील रिक्त पदे खालीलप्रमाणे :

सौजन्य- माहिती अधिकारातुन मिळालेली आकडेवारी

 

First Published on: September 24, 2018 4:00 PM
Exit mobile version