भरती – महापालिकेत वाहनचालक पदासाठी जागा रिक्त, ‘इथे’ करा अर्ज!

भरती –  महापालिकेत वाहनचालक पदासाठी जागा रिक्त, ‘इथे’ करा अर्ज!

मुंबई महानगरपालिका नोकरभरती

मुंबई महापालिकेच्या आस्थापनेवरील अनेक वाहनचालकांच्या रिक्त जागी कोणत्याही प्रकारे भरती न करणाऱ्या प्रशासनाने अखेर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉक-डाऊनच्या काळात रखडलेल्या भरतीचे टाळे उघडले.  मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या आस्थापनेवरील वाहनचालकांच्या ६५ जागांसाठी महापालकेने जाहिरात प्रसिध्द केली आहे. या ६५ जागांसाठी महापालिकेने पुढील २८ एप्रिलपर्यंत उमेदवारांकडून स्पीड पोस्टद्वारे अथवा ई-मेलद्वारे अर्ज मागवले आहेत.

मुंबई महापालिकेने कोरोना कोविड १९च्या बाधित रुग्णांची सेवा करण्यासाठी खुल्या पध्दतीने ११४ आणि २००७मधील भरतीतील रद्द केलेली प्रतीक्षा यादी पुनजिर्वित करून त्यातून १४८ जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता महापालिकेच्या वाहनचालकांच्या ६५ रिक्त पदांसाठी जाहिरात मागवली आहे. यामध्ये किमान शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण असून त्यांच्याकडे प्रादेषिक परिवहन कार्यालयाचे अर्थात आरटीओचे हलके अथवा जड वाहन चालवण्याचा परवाना असावा. हा वैध परवाना किमान दोन वर्षे जुना असणे आवश्यक आहे. तसेच खासगी  किंवा निमशासकीय खात्यांमध्ये नियमित अथवा कंत्राटी पध्दतीने वाहन चालवण्याचा दोन वर्षाचा अनुभव असावा अशी अट आहे.

व्यावसायिक चाचणी परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी मूळ कागदपत्रे तसेच मूळ कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित छायांकित प्रतींचे दोन संच सोबण आणणे आवश्यक आहे. कागदपत्रांच्या छाननीनंतर उमेदवारांची व्यावसायिक चाचणीतील ९० गुण व  पुर्वानुभव निकष आदींच्या गुणांद्वारे आरक्षण निहाय निवड केली जाणार आहे. याबाबतची जाहिरात मुंबई महापालिकेच्या http://portal.mcgm.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एकूण पदे : ६५

वेतनश्रेणी मासिक : २० हजार ७०० ते ६५ हजार ८००पर्यंत

शैक्षणिक अर्हता : दहावी तसेच आरटीओचा जड किंवा हलके वाहन चालवण्याचा परवाना

वय मर्यादा : ३८ वर्षे

वाहनचालकाचा अनुभव: २ ते १० वर्षे

अर्ज कुठे आणि कसा कराल

अर्ज स्पीडपोस्टाने पाठवण्यासाठी पत्ता : कार्यकारी अभियंता (परिवहन)शह यांचे कार्यालय वरळी यान गृह इमारत, पहिला मजला ई मोझेस मार्ग, वरळी, मुंबई ४००००१८

अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल

Mcgm.driver@mcgm.gov.in

अर्ज स्पीडपोस्टाने किंवा ई-मेलद्वारे पाठवण्याची अंतिम तारीख – १८ ते २८ एप्रिल २०२०

 

First Published on: April 18, 2020 4:34 PM
Exit mobile version