Vaccination: मुंबई, महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु

Vaccination: मुंबई, महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु

Corona Vaccination : लसींच्या पुरवठ्यासाठी पालिका उत्पादक कंपन्यांकडे करतेय पाठपुरावा

देशात आज लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात देशातील १८ ते ४५ वर्षांमधील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. मुंबई महाराष्ट्रासह देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी केंद्र सरकारने १८ वर्षांवरील नागरिकांनाही लस देण्याची घोषणा केली. काही राज्यांनी लसीचा तुटवडा असल्याचे कारण देत लसीकरणाला सुरुवात केलेली नाही. पश्चिम बंगाल, कर्नाटक, ओडीसा, तमिळनाडू, झारखंड, उत्तराखंड,जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांनी लसीचा पुरवठा नसल्याने लसीकरण सुरु केलेले नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्र, पंजाब व बिहारमध्येही लस उपलब्ध नसल्याने लसीकरण सुरु केलेले नाही. मात्र महाराष्ट्रात काही मोजक्या ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे.

लसीकरण करण्याआधी कोविन अँप किंवा कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. १८ ते ४५ वर्षांतील नागरिकांच्या लसीकरणासाठी २८ एप्रिलपासून रजिस्ट्रेशन करण्यास सुरुवात झाली. केवळ २-३ दिवासात २ लाखांहून अधिक नागरिकांनी लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केले.

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. डॉक्टर,नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार यांचा यात समावेश होता. त्यानंतर ४ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात आले. आता पर्यंत ४५ वर्षांवरील नागरिकांना १५.४८हून अधिक डोस देण्यात आले आहेत. आज पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करण्याची घोषणा केली मात्र देशात लसीचा अपुरा साठा असल्याने अनेक राज्यांना लसीचे डोस उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे अनेक राज्यांनी लसीकरण करण्यात असमर्थतात दर्शवली आहे.


हेही वाचा – महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांचे हुतात्म्यांना अभिवादन

First Published on: May 1, 2021 9:47 AM
Exit mobile version