शिवसेना विरोधकांची पोकळी भरतेय

शिवसेना विरोधकांची पोकळी भरतेय

वंचित बहुजन आघाडी

मेट्रोच्या कारशेड डेपोसाठी भाजपने समर्थनाची तर शिवसेनेने विरोधी भूमिका घेतली आहे. शिवसेना विरोधाच काम करून विरोधी पक्षांसाठी जागा हिरावून घेण्याचे काम करत आहे. मी मारल्यासारखे आणि तू रडल्यासारखे करायचे असाच प्रकार सत्ताधार्‍यांनी सुरू केला आहे. अशाच वागण्याने सत्ताधार्‍यांनी प्रकल्प रेटून नेले आहेत. आरे कारडेपो सारखाच विरोध कोस्टल रोड लाही करणार असल्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीने आज पत्रकार परिषदेत मांडली.

यापुढच्या विधानसभा निवडणुकीत जिंकून येणारे उमेदवार हे सभागृहातही या प्रकल्पाच्या विरोधातील भूमिका मांडणार आहेत. प्रकल्पाला विरोध नाही पण मेट्रो कारशेडला आहे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली.

मेट्रो कारशेडच्या जागेला कांजूरमार्गचा पर्याय आहे. पण जिथे विकासकांना जागा विकसित करण्यासाठी मज्जाव आहे, अशा ठिकाणी बंगले उभारायचे आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ए डी सावंत यांनी केला. तसेच दिल्लीतील मेट्रोच्या जाळ्यामुळे त्याठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणावर एअर कंडीशनरचा वापर क्लोरोफोरो कार्बन उत्सर्जनासाठी कारणीभूत आहे. तशीच तापमानातील वाढ मुंबईतही होणार आहे. संपूर्ण मुंबईतील मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईतील तापमानात ३ ते ५ टक्के वाढ होईल, असे मत सावंत यांनी मांडले.

First Published on: September 19, 2019 5:49 AM
Exit mobile version