Coronavirus – मुंबईकरांच्या ताटातून भाजी गायब? भाजीआवक उद्यापासून बंद!

Coronavirus – मुंबईकरांच्या ताटातून भाजी गायब? भाजीआवक उद्यापासून बंद!

Cornavirus: भाजीपाला, फळ मार्केट बंद राहणार!  

करोनाचा परिणाम भाजीपाल्याच्या पुरवठ्यावरही झालेला आहे. नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजारसमितीतून होणारी भाजीपाल्यांची आवक बुधवार पासून बंद होणार आहे. भाज्य पोहचवण्यास वाहतूकदारांनी नकार दिल्यामुळे व्यापारी मंगळवारी उरलेला माल विकतील त्यानंतर बुधवारपासून ३१ मार्चपर्यंत बाजार पुर्णपणे बंद असेल. त्यामुळे मुंबईला होणाऱ्या भाजीपाल्याच्या पुरवठय़ात मोठी घट होणार असून सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसणार आहे.

केंद्र सरकारच्या आवाहनानुसार रविवारी जनता संचारबंदी पाळण्यात येणार होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शनिवारी अतिरिक्त माल खरेदी केला होता. मात्र विक्रेत्यांकडील हा माल सोमवारी संपला होता. शहरातील मध्यवर्ती भाजी बाजार असलेल्या दादरमधील व्यापाऱ्यांकडील शेतमालाचा साठा संपल्याचे दिसत होते. सोमवारीही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातून पुरेसा माल आला नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दादर बाजारातील काही व्यापारी थेट शेतकऱ्यांकडूनच माल खरेदी करत असल्याने त्यांच्याकडे भाजीपाला होता. मात्र तोही अपुरा असल्याने मुंबईकरांना येत्या दोन-तीन दिवसांत मोठय़ा तुटवडय़ाला सामोरे जावे लागणार आहे.

भाज्यांच्या दरात वाढ

भाज्यांच्या अपूऱ्या पुरवण्यामुळे भाज्यांच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. ५० रुपये किलो असणाऱ्या मिरचीचे दर किलोमागे ७५ रुपये झाले आहेत. तर कोबी ५० रूपये किलो झाला आहे. वांग्याचे ८० रुपये झाले आहेत. तर मेथीची जूडी, कोथींबरीच्या जूडीच्या दरातही वाढ झाली आहे.


हे ही वाचा- Coronavirus Live Update: १ लाखांपेक्षा जास्त करोनाग्रस्त रुग्ण झाले बरे!


 

First Published on: March 24, 2020 8:48 AM
Exit mobile version