भाजी विक्रेता कोट्यधीश होणार होता पण…

भाजी विक्रेता कोट्यधीश होणार होता पण…

प्रातिनिधिक फोटो

एका रात्रीत कोट्याधीश होण्याचा शॉर्टकट मार्ग म्हणजे लॉटरी. ‘आपल्याला जर लॉटरी लागली तर?’ मग काय नवी गाडी, नवे घर घेण्याचे स्वप्न दिसू लागतात. याच लालसेपोटी सामान्य लोक लॉटरीचे तिकिटे विकत घेत असतात. परंतु, तिकिट लागल्या नंतरही जर पैसे मिळाले नाही तर? किंवा एकच लॉटरी दोन लोकांना लागली तर? प्रश्न आश्चर्यचकीत करणारे आहे. परंतु, अशीच एक घटना कल्याणच्या एका भाजी विक्रेत्यासोबत घडली आहे.

काय आहे प्रकरण?

४४ वर्षीय सुहास कदम नोकरी करून कल्याण स्थानकावर भाजी विक्रिचा व्यवसाय करतात. त्यांनी १६ मार्चला कल्याण स्थानका जवळील एका लॉटरी विक्रेत्याकडून १०० रुपयांचे ५ लॉटरीची तिकिटे खरेदी केली. २० मार्चच्या सोडतीत त्यांना १ कोटी ११ लाखांची लॉटरी लागल्याचे समजले. परंतू हा आनंद जास्त काळ टीकू शकला नाही. कारण अजूनही त्यांना लॉटरीचे पैसै मिळालेले नाहीत.

लॉटरीची किंमत विजेत्याला कधीच देण्यात आली आहे

लॉटरीचे पैसे मिळाले नाहीत म्हणून सुहास कदम महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयात गेले. तिथे गेल्यावर कदम यांना धक्काच बसला. कारण तिथे त्यांना सांगण्यात आले की, संबंधित लॉटरीच्या विजेत्याला बक्षीस दिलेले आहे. हा प्रकार ऐकून कदम यांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी लॉटरी विक्रेता आणि अन्य विजेत्याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत धारणे यांनी दिली. त्याचबरोबर सुहास कदम यांनी याबाबतीत मुख्यमंत्री आणि ठाणे जिल्हा पोलीस आयुक्त यांनाही पत्र लिहिले असून याप्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली आहे.

एकाच तिकिट क्रमांकावर तिघांचा दावा

एकाच लॉटरी तिकिट क्रमांकावर तिघांनी दावा केला असल्याचे महाराष्ट्र राज्य लॉटरी आयुक्त अमित सैनी यांनी सांगितले. त्याचबरोबर ‘बारकोडची पडताळणी करुनच विजेत्याला रक्कम दिली जाते. परंतु बाजारातील बनावट तिकिटे ही एक गंभीर बाब आहे’, असेही ते म्हणाले.

घरच्यांना काय सांगू कळत नाही – कदम

कदम मागील पाच वर्षांपासून लॉटरीचे तिकिटे विकत घेत आहेत. परंतु, आतापर्यत त्यांना २०० रुपयांपेक्षा जास्त रुपयांची लॉटरी लागली नव्हती. कदम यांनी सांगितले की, ‘लॉटरी लागल्यापसून घरच्यांना खूप आनंद झाला आहे. त्यांची घर, गाडी यासारखे अनेक स्वप्ने आहेत. आम्हाला अभिनंदन करण्यासाठी गावावरून नातेावाईक घरी येत आहेत. परंतु त्यांना काय उत्तर देऊ हेच कळत नाही.’, अशी खंत कदम यांनी व्यक्त केली.

First Published on: June 13, 2018 7:15 AM
Exit mobile version