भरधाव वाहनाची ट्रकला धडक; एकाच कुटुंबातील ६ जखमी, २ ठार

भरधाव वाहनाची ट्रकला धडक; एकाच कुटुंबातील ६ जखमी, २ ठार

संग्रहित छायाचित्र

नाशिक जिल्ह्यातील गिरणारेजवळील दाभाडी फार्मजवळ बुधवारी रात्री भरधाव वाहानाने ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जखमी झाले असून; दोनजण ठार झाले असल्याची माहिती मिळतेय. अपघातातील जखमींना उपचाराकरता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंगाम्हाळुंगी येथील वयवर्ष ३० असणाऱ्या निर्मला जनार्दन पालवे आणि वय वर्ष रेखा ऊर्फ पूनम वाल्मिक पालवे (वय ३५) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

असा घडली घटना

पालवे कुटुंबिय ट्रकमधून गिरणारेकडून गंगाम्हाळुंगीकडे जात होते. ट्रकमध्ये माती भरलेली होती. त्यावेळी हरसूलकडून आलेल्या भरधाव वाहनाने ट्रकला धडक दिली. या अपघातात पालवे कुटुंबिय गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमींना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान बुधवारी रात्री निर्मला पालवे यांचा मृत्यू झाला. तर गुरुवारी सकाळी रेखा पालवे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

First Published on: February 25, 2021 3:40 PM
Exit mobile version