सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार लटकणार; विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली चिंता

सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार लटकणार; विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली चिंता

कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. याचा थेट परिणाम महसूलावर झाला असून सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. परिणामी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे कसे, असा प्रश्न सरकारला पडला आहे. यामुळे खासगी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी कर्मचाऱ्यांचेही पगार लटकण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती अशीच राहीली तर सरकारला कर्ज काढून पगार वाटप करावे लागेल, अशी चिंता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी राज्याच्या सद्यआर्थिक परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी महसूलात घट झाल्याने पुढील महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांनां वेतन देण्यासाठी कर्ज काढावे लागण्याची शक्यता वर्तवली. तसेच आरोग्य, मदत व पुनवर्सन यांसह दोन विभाग वगळता इतर विभागात पगार कपात करण्याची शक्यताही यावेळी वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. तसेच डॉक्टर, नर्स व त्यांच्याशी संबंधित कोरोना योद्धांचे पगार दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –

TikTok बंद झाले, दोन बायकांसह दादल्यालाही रडू कोसळले!

First Published on: July 2, 2020 3:15 PM
Exit mobile version