मुंबईत चाललंय काय? १२९ किलो एमडी, १ कोटींची रोकड सापडली!

मुंबईत चाललंय काय? १२९ किलो एमडी, १ कोटींची रोकड सापडली!

१२९ किलो एमडी आणि १ कोटी रोख

देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. एकीकडे गणेशभक्त बाप्पाच्या भक्तीमध्ये तल्लीन असतानाच दुसरीकडे एटीएस अर्थात दहशतवादविरोधी पथकाने मुंबईतून तब्बल १२९ किलो एमडी (मेफेड्रोन) जप्त केलं आहे. त्यासोबतच मोठ्या प्रमाणावर रोकडही हस्तगत करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात उत्सवादरम्यान अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचं उघड झालं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, एटीएसच्या विक्रोळी युनिटने ही कारवाई केली आहे. मेफेड्रोन या एक प्रकारच्या अंमली पदार्थावर बंदी घालण्यात आली आहे. सोमवारी ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भांडुपच्या पम्पिंग स्टेशनजवळ बॅगांमध्ये काहीतरी असल्याची माहिती एटीएसच्या विक्रोळी युनिटला मिळाली. त्याबरोबर एटीएसने लागलीच घटनास्थळावर जात तपासणी केली असता त्यातून तब्बल १२९ किलो एमडी त्यांना सापडलं. त्यासोबत १ कोटी ४ लाख ९४ हजार इतकी रोख रक्कम देखील मिळाली. ही सर्व रक्कम २ हजार आणि ५००च्या नवीन नोटांमध्ये होती. त्यामुळे इतकी मोठी रक्कम आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर एमडी मुंबईत आलं कुठून? याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी नार्कोटिक ड्रग्ज अॅण्ड सायकोड्रॉपिक सबस्टॅन्स अॅक्ट, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – सागाची चोरटी वाहतूक रोखली!
First Published on: September 10, 2019 7:51 PM
Exit mobile version