मुंबईच्या पावसात स्विगी बॉयची भन्नाट आयडिया, घोड्यावरून पोहोचवली ऑर्डर

मुंबईच्या पावसात स्विगी बॉयची भन्नाट आयडिया, घोड्यावरून पोहोचवली ऑर्डर

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने मुंबईत तुफान बॅटिंग (Heavy rain in mumbai) केली आहे. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडीत मुंबईकर अडकत आहेत. मात्र, याच वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून एका स्विगी डिलिव्हरी बॉयने हटके पर्याय अवलंबत चक्क घोडे सवारी केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. दरम्यान, स्विगीनेही याची दखल घेतली असून या घोड्याला शोधण्याचं आवाहन केलं आहे. (VIRAL VIDEO: Food delivery boy rides horse to drop off orders amidst Mumbai rains)

 

मुंबईतील बरेच रस्ते नेहमीच वाहतूक कोंडीत अडकलेले दिसतात. त्यातच, स्विगीसारख्या फूड डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशा ट्राफिकमध्ये अडकून पडावं लागतं. त्यामुळे अनेकदा ग्राहकांकडून तक्रारी येतात. पावसाळ्यातही हीच परिस्थिती असते. त्यातच, मुंबईच्या रस्त्यांवर या डिलिव्हरी बॉयने चक्क घोडे सवारी करत ऑर्डर पोहोचवली असल्याचं नेटिझन्स म्हणत आहेत.

हेही वाचा – स्विगी, फूडपांडा, झोमॅटो डिलीव्हर फ्रॉम मुंबईच्या झोपडपट्ट्या

दरम्यान, अनेकांनी याविरोधात तक्रारीचा सूरही लावला आहे. एखाद्या बाईकस्वाराने किंवा चारचालकाने घोड्याला धडक दिली तर घोडा जखमी होऊ शकतो, त्यामुळे मुंबईच्या वर्दळीच्या ठिकाणी प्राण्यांवरून सवारी करू नये. तसेच, रस्ते कायद्यानुसार, मुंबईत घोडेसवारी वगैरे बेकायदा असल्याने अशाप्रकारे घोडेसवारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत तुफान पाऊस कोसळत आहे. पुढील पाच दिवस मुंबईत येलो अलर्ट दिला आहे.

First Published on: July 6, 2022 3:02 PM
Exit mobile version