यूक्रेनच्या राष्ट्रपतींची वेब सीरीज दिसणार ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर

यूक्रेनच्या राष्ट्रपतींची वेब सीरीज दिसणार ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर

रशिया आणि यूक्रेनमधील युद्धाचा पेटता वणवा थांबायचं नाव घेत नाहीये, दोन्ही देश एकमेकांवर पेटून उठले आहेत. अशावेळी यूक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमिर झेलेंस्की चांगलेच चर्चेत आले आहेत. तुम्हाला ठाऊक असेलचं की झेलेंस्की यूक्रेनचे राष्ट्रपती होण्याआधी एक अॅक्टर आणि कॉमेडियन होते. झेलेंस्कींनी त्यांच्या करिअरमध्ये बऱ्याचं चित्रपट आणि टीव्ही सिरीजमध्ये काम केलं होतं. ज्यात एक सिरीज होती, ‘सर्व्हंट ऑफ द पीपल’. हीच सिरीज आता एका प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मवर येऊ घातली आहे.

झेलेंस्कीची कॉमेडी सिरीज आता नेटफ्लिक्सवर

सर्वेंट ऑफ द पीपल या कॉमेडी सिरीजमध्ये झेलेंस्कीने एका शिक्षकाची भुमिका साकारली होती. यामध्ये या शिक्षकाला नंतर एक राष्ट्रपती बनण्याची संधी मिळते. ही सिरीज यूक्रेनमध्ये खूप हिट झाली होती आणि या सिरीजचे तीन सीजन रिलीज झाले होते. इतकंचं नव्हे तर या सिरीजचं यश पाहून या सिरीजचा चित्रपट सुद्धा बनवण्यात आला होता. आता ‘सर्व्हंट ऑफ द पीपल’ ही वेब सिरीज नेटफ्लिक्स सुद्धा येणार आहे.

झेलेंस्कीची सिरीज ‘सर्वेंट ऑफ द पीपल’ला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली होती. त्यामुळे नेटफ्लिक्सने हे पाऊल उचललं आहे. नेटफ्लिक्स यूएस ने ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, तुम्ही मागितलं आणि आम्ही त्याला परत घेऊन आलो, ‘सर्व्हंट ऑफ द पीपल’ पुन्हा एकदा नेटफ्लिक्स यूएस वर उपलब्ध आहे. २०१५ मध्ये आलेल्या या कॉमेडी सिरीजमध्ये झेलेंस्की एका शिक्षकाची भुमिका साकारत आहेत, जो भ्रष्टाचारा विरूद्ध तक्रारीचा एक विडिओ बनवतो, आणि तो विडिओ वायरल झाल्यानंतर राष्ट्रपती बनतो.

देशासाठी लढणारा झेलेंस्की


खरंतर या सिरीज नंतर झेलेंस्कीच्या राजनीतिक करिअरला सुरूवात झाली होती. २०१९ मध्ये झेलेंस्कीने ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळवून राष्ट्रपतीचं पद मिळवलं होतं. रशिया सोबत यूक्रेनच्या युद्धात झेलेंस्की हिरो बनून समोर आले आहेत.या युद्धात झेलेंस्की पूर्ण हिम्मत दाखवून देशवासियांची मदत करत आहे.

First Published on: March 19, 2022 8:06 PM
Exit mobile version