ठाणे जिल्हा न्यायालयातही न्यायाधीश, वकिलांनी केले व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक

ठाणे जिल्हा न्यायालयातही न्यायाधीश, वकिलांनी केले व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक

न्यायाधीश, वकिलांनी केले पाहिले व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक

शासन यंत्रणेचा तिसरा आधारस्तंभ म्हणजे न्यायपालिका. या महत्वपूर्ण यंत्रणेतील सर्वोच्च पद भूषविणाऱ्या न्यायमूर्तीनी शुक्रवारी स्वत: ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पाहणी केली आहे. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष मतदान करून प्रात्यक्षिक पाहिले आहे. ठाणे जिल्हा प्रशासनाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे अधिकाधिक जनजागृती करण्यास सुरुवात केली असून त्याविषयीही प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.जी.बिष्ट यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी विभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील हे देखील उपस्थिती होते.

उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोलकर यांनी यावेळी या मशीन्सचे प्रात्यक्षिक दाखवून तांत्रिक बाबींची माहिती दिली आहे. यावेळी सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयाचा कर्मचारी वर्ग यांनी व्हीव्हीपॅटवर प्रत्यक्ष मतदान करून चाचणी घेतली आहे. तर बार कौन्सिलच्या सदस्य वकिलांनी देखील व्हीव्हीपॅटविषयी माहिती जाणून घेऊन समाधान व्यक्त केले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी व्यक्त केले समाधान

‘ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात निवडणूक शाखेतर्फे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे ठाणे जिल्ह्यात सर्व स्तरांवर ही प्रात्यक्षिके दाखवून जनजागृती सुरु असून नागरिकांचाही त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. यासाठी ठिकठिकाणी माहिती रथ फिरत असून व्हीव्हीपॅटविषयी लोकांच्या मनात असलेल्या शंकांचे प्रशिक्षित व्यक्तींकडून निरसन करण्यात येत’, असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.

First Published on: January 19, 2019 8:11 PM
Exit mobile version