व्यंकनाथ सेवा सोसायटी अफरातफर

व्यंकनाथ सेवा सोसायटी अफरातफर

प्रातिनिधिक फोटो

श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ सेवा सहकारी सोसायटी आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्यासह तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये बाळासाहेब उर्फ प्रवीणकुमार नाहटा, लालासाहेब काकडे, सुभाष कोळपे, विठ्ठलराव खेडकर, मोहन काकडे, राजाभाऊ काकडे, बाबासाहेब कुदांडे, संभाजीराव काकडे, रुपाली काकडे, संतोष काकडे, भगवान धाकड यांच्यासह सचिव बबन भागवत, श्रीपती साळवे अशा १३ जणांचा समावेश आहे. 7 फेब्रुवारी 2015 ते 26 सप्टेंबर 2018 या काळात मयत सभासदाच्या विमा रकमेत संगनमताने अपहार केल्याचा आरोप या संचालकांवर आहे.

यात संस्था रोजकिर्द, व्हाऊचर आणि मयताची पत्नी यांनी दिलेले प्रतिज्ञापत्र यामध्ये विसंगती आढळून आली आहे. संचालक मंडळ व सचिव यांनी खोटी व्हाऊचर तयार केली. बोगस नोंदी केल्या, खोटे आभिलेख तयार केले व मयत सभासदच्या विमा रकमेचा अपहार केल्याचे सहकार खात्याने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.याप्रकरणी सहकार खात्याचे आधिकारी चाबूकस्वार यांनी व्यंकनाथ सेवा सहकारी सोसायटीचे संचालक मंडळ आणि सचिवाविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

First Published on: February 13, 2019 5:08 AM
Exit mobile version