येत्या मंगळवारी खार ते विलेपार्लेतील काही भागात पाणी बंद

येत्या मंगळवारी खार ते विलेपार्लेतील काही भागात पाणी बंद

18 मे पासून आता पुणे शहरात पाणी कपात करण्याचा निर्णय पुणे महानगर पालिकेने घेतला आहे. दर गुरुवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

मुंबई महापालिका जल अभियंता खात्यामार्फत पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी पाणीपुरवठ्याशी संबंधित झडप (बटरफ्लाय व्हॉल्व) येत्या मंगळवारी (१३ जुलै) सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत बदलण्यात येणार आहे. त्यामुळे सांताक्रूझ, जुहू, अंधेरी, खार आणि विलेपार्ले येथील काही भागात सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत पाणीपुरवठा बंद असणार आहे. काही भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करुन त्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिका जल अभियंता खात्याने केले आहे.

पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी संबंधित झडप (बटरफ्लाय व्हॉल्व) येत्या मंगळवारी सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत बदलण्यात येणार आहे. याच कारणास्तव या दिवशी एच/पश्चिम, के/पूर्व आणि के/पश्चिम या ३ विभागातील जुहू, विलेपार्ले, सांताक्रूझ आणि खार (पश्चिम), अंधेरी (पूर्व व पश्चिम) इत्यादी परिसरातील काही भागांत पाणी बंद राहणार आहे, तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

गिलबर्ट हिल, जुहू कोळीवाडा, चार बांगला, विलेपार्ले, सहार मार्ग, ना.सी.फडके मार्ग, गुंदवली गावठाण, साईवाडी, तेलीगल्ली, जिवा महाले मार्ग, मोगरपाडा आदी भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तर विलेपार्ले (पश्चिम), जेव्हीपीडी, एच/ पश्चिम, के/पश्चिम, के/पूर्व या विभागातील काही भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

First Published on: July 9, 2021 9:41 PM
Exit mobile version