मुंबई मेट्रो रेल्‍वेच्‍या कामासाठी ‘या’ भागात होणार पाणीकपात

मुंबई मेट्रो रेल्‍वेच्‍या कामासाठी ‘या’ भागात होणार पाणीकपात

प्रातिनिधीक फोटो

बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रात एम.एम.आर.डी.ए. च्‍या पुढाकाराने अनेक ठिकाणी मेट्रो रेल्‍वेची कामे सुरु आहेत. याच मेट्रो रेल्‍वेच्‍या कामासाठी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील पिलर नं. १५५ ते १५६ दरम्यान असणारी १२०० मि‍ली मीटर व्यासाची जलवाहिनी वळविण्याचे काम दिनांक २२ सप्‍टेंबर २०२० रोजी सायंकाळी ५.३० वाजल्‍यापासून ते दिनांक २३ सप्‍टेंबर २०२० रोजी पहाटे ४.३० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.

यामुळे सदर कालावधीत म्‍हणजेच दिनांक २२ सप्‍टेंबर २०२० व दिनांक २३ सप्‍टेंबर २०२० रोजी अंधेरी, गोरेगांव व जोगेश्‍वरीतील काही भागातील ‘के पश्चिम’, ‘के पूर्व’ व ‘पी दक्षिण’ या तीन विभागातील काही परिसरांमध्‍ये पाणी कपात होण्‍यासह पाणीपुरवठय़ाच्या वेळेतही तात्‍पुरता बदल करण्यात येणार आहे.

तसेच यामुळे सदर परिसरांमध्‍ये पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. ही बाब लक्षात घेऊन संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्‍याचा यथायोग्‍य साठा करावा आणि पाणी जपून वापरत बृहन्मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्‍या जल अभियंता खात्‍याद्वारे करण्‍यात येत आहे.


अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना दिलासा; पश्चिम रेल्वेच्या १५० फेऱ्या वाढणार

First Published on: September 19, 2020 10:26 AM
Exit mobile version