Corona: पश्चिम रेल्वेचा मदतीचा हात! झटपट तयार केले १ लाखाहून अधिक मास्क

Corona: पश्चिम रेल्वेचा मदतीचा हात! झटपट तयार केले १ लाखाहून अधिक मास्क

भारतीय रेल्वे कर्मचारी आपल्या रेल्वे कर्मचारी, सामान्य नागरिक, रेल्वे पोलिसांसाठी मास्क बनवणे, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोजचे वाटप करणे ही सेवा देण्यासाठी सरसावले आहेत. आतापर्यंत पश्चिम रेल्वेच्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी १ लाख २० हजार ३२५ मास्क आणि १० हजार ३५९ लीटर सॅनिटायझरची निर्मिती केली आहे. त्यामुळे रेल्वेचे कर्मचारी कोरोनाशी लढण्यासाठी आपले योगदान देत असल्याचे यातून पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – LockDown: मुंबई-पुण्याला सवलत नाही; मुख्यमंत्री निर्णयावर ठाम

कोरोनामुळे देशात हाहाकार माजला आहे. आता ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरु आहे. यामधील कर्मचाऱ्यांना मास्कचा पुरवठा करण्यासाठी महिला, तिकीट तपासक स्वतः मास्क शिवत आहेत. स्टेशन मास्टर हे रेल्वे पोलिसांना, सफाई कामगारांना सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोजचे वाटप करत आहेत. पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल वर्कशॉपमध्ये कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलकरता बेडशीट, उशांचे कवर, वैद्यकीय स्टाफकरता कपड्यांचे २० सेट, २० हजार ५० मास्क, १०० कॅप तयार केल्या आहेत. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांकरता रेल्वेतर्फे आयसोलेशन कक्ष तयार करण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वेने ३२० रुग्णांकरता ४० पॅसेजर कोचचे रुपांतर आयसोलेशन कक्षात केले आहे. या कोचमध्ये ६० आॅक्सिजन सिलेंडर ट्रॉली, मच्छरदानी, पार्टीशन, पडदे असे सुसज्ज सोय अहेत.

First Published on: April 21, 2020 8:27 PM
Exit mobile version