रेल्वेखाली प्रवाशी आल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

रेल्वेखाली प्रवाशी आल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

(फोटो प्रातिनिधिक आहे)

संध्याकाळी घरी परतण्याच्या वेळेला पश्चिम रेल्वे रखडल्याची माहिती मिळत आहे. पश्चिम रेल्वेच्या धीम्या मार्गावरील सर्व ट्रेन अर्धा तास उशीराने धावत आहेत. मुंबई सेंट्रल स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. २ वर एक प्रवाशी रेल्वेखाली आल्यामुळे संबंधित लोकल ट्रेन एकाच जागी थांबली आहे. त्यामुळे मुंबई सेंट्रल स्थानकात धीम्या गतीच्या रेल्वे एकापाठोपाठ अडकल्या आहेत.

तर दुपारी मध्य रेल्वेवर देखील एक समस्या निर्माण झाली होती. ४.३० वाजताच्या दरम्यान परळच्या जवळ सीएसटीच्या दिशेला रेल्वे मार्गाशेजारील असलेले झाड जळाले. त्यामुळे काही काळ खळबळ उडाली होती. मात्र या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर कसलाही परिणाम पडला नव्हता

First Published on: June 4, 2019 9:39 PM
Exit mobile version