Corona नियंत्रणासाठी ऑक्सिजन व्यवस्थापनाचे ‘मुंबई मॉडेल’ कसे आहे?

Corona नियंत्रणासाठी ऑक्सिजन व्यवस्थापनाचे ‘मुंबई मॉडेल’ कसे आहे?

Corona नियंत्रणासाठी ऑक्सिजन व्यवस्थापनाचे 'मुंबई मॉडेल' कसे आहे?

देशात कोरोनाचे सर्वाधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये मुंबई शहराचाही समावेश आहे. मात्र मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेला मोठ्याप्रमाणात यश येत आहे. एप्रिल महिन्यात ११ हजारांचा टप्पा गाठणारी मुंबईतील रुग्णसंख्य़ा २५५४ वर पोहचली आहे. देशात कोरोनाची दुसऱ्या लाटेने हैदोस घातला असल्याने अनेक शहरांची आरोग्य व्यवस्था अद्यापही व्हेंटिलेटरवर आहे. यात मुंबईतील कोरोनाचा सर्वाधिक रुग्णसंख्येने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. मात्र मुंबईत कोरोना रुग्णसंख्य़ा नियंत्रणात आणण्यात इतर राज्यांचा तुलनेत सर्वाधिक यश मिळत आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालायानेही मुंबई मॉडेलचं कौतुक केले. तसेच मुंबई पालिकेच्या ऑक्सिजन व्यवस्थापनाचीही सर्वोच्च न्यायालयाने स्तुती केली आहे. कोरोना नियंत्रणात आणणारा ऑक्सिजन व्यवस्थापनेचा मुंबई मॉडेल नेमका कसा आहे हे जाणून घेऊया.

मुंबईतील ऑक्सिजन व्यवस्थापनेचा ‘मुंबई मॉडेल’ नेमका कसा आहे ?

१) मुंबईत ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाल्याने महानगरापालिकेने तातडीने ऑक्सिजन नियोजन करण्यास सुरुवात केली.

२) २८ हजार बेड्सपैकी सुमारे १२ ते १३ हजार बेड्सवर ऑक्सिजन सप्लाय करण्याची व्यवस्था केली.

३) सुरुवातीला रुग्णसंख्या कमी असल्याने पालिका साधारण ऑक्सिजन सिलेंडरवल अवलंबून होती, मात्र रुग्णसंख्या चौपट वाढल्याने पालिकेने दहापट जास्त क्षमता असणाऱ्या जंबो सिलेंडर्स वापरासाठी आणले. साधारण ऑक्सिजन सिलिंडरपेक्षा या सिलिंडरची क्षमता दहा टक्के अधिक असते.

४) त्याचबरोबर १३ हजार किलोलीटर क्षमतेची मेडिकल लिक्विड ऑक्सिजनची टाकी उभारली. त्यामुळे रुग्णालये

५) त्यानंतर पालिकेने 13 हजार किलोलीटर क्षमतेची द्रव वैद्यकीय ऑक्सिजन टाकी उभारली. त्यामुळे प्रत्येक रुग्णालय ऑक्सिजन रिफिलिंग मोडमधून स्टोरेज किंवा पुरवठा मोडमध्ये बदलण्यात आले आहे.

६) ज्या ठिकाणी अधिक बेडस आहेत तिथं 2 जंबो ऑक्सिजन सिलेंडर्स तैनात करण्यात आले. त्यामुळे या सर्व बेड्ससाठी २ ते ३ दिवस पुरेल इतका ऑक्सिजन होता. यावेळी ऑक्सिजनचा वापर १० ते १२ टक्के होता आणि तो पालिकेच्या आवाक्यात आहे.

७) तथापि जर ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला तर जुन्या सिलेंडरचा वापर करता यावा यासाठी पालिकेने जुने सिलेंडर स्क्रॅप न करता राखीव ठेवले.

८) पालिकेने या जुन्या सिलेंडर्समधून रुग्णांच्या गरजेनुसार १ ते २ दिवस पुरु शकेल इतका ऑक्सिजन साठा राखीव ठेवला. यामुळे पालिकेला मृत्यूचं प्रमाण तपासण्यात मदत झाली.


 

First Published on: May 6, 2021 6:32 PM
Exit mobile version