पालिकेची ही कोणती दादागिरी – किरिट सोमय्या

पालिकेची ही कोणती दादागिरी – किरिट सोमय्या

मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त असतानाच आधीच कोरोनाचा मृत्यांक घोटाळा आणि आणि आता रुग्णांचे पॉझिटिव्ह अहवाल लपवण्याची फसवेगिरी मुंबई महानगर पालिका करत असल्याचा आरोप भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला आहे. खासगी लॅबधारकांनी कोरोना रुग्णांचे पॉझिटिव्ह अहवाल हे रुग्णांना न देता ते आधी पालिकेला कळवावेत अशा प्रकारचा आदेश महापालिकेने १३ जूनला काढल्याचे म्हणत जो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक जे आधीच हायरिस्कमध्ये आहेत, त्यांना त्यांचा अहवाल न सांगता खासगी लॅबनी हा अहवाल आधी पालिकेला सादर करणे म्हणजे हा शुध्द मूर्खपणा असून ही पालिकेची दादागिरी असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

तसेच यात लॉजिक ते काय असा सवाल करत मुंबई महानगरपालिकेने हे परिपत्रक ताबडतोब मागे घ्यावे अशी विनंती सोमय्या यांनी केली आहे. तसेच याबाबत त्यांनी पालिका आयुक्त इक्बाल चहल यांना पत्र लिहिले असून, यामध्ये त्यांनी ५ जून रोजी काढलेल्या परिपत्रकाबाबत पुन्हा विचार करा आणि १३ जूनचे परिपत्रक मागे घ्यावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान १३ जूनच्या परिपत्रकात कोणत्याही खाजगी लॅबने रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यास तो थेट रुग्णाला देऊ नये असे म्हटले आहे. तसेच ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत त्यांना अहवाल द्यावे.

सकारात्मक अहवाल फक्त महापालिकेमार्फतच दिले जातील. पालिका प्रभावित व्यक्ती/कुटुंबाला कळवेल की, ते/व्यक्ती सकारात्मक आहे. याबाबत दिलेली कारणे आणि तर्क हे अत्यंत चुकीचे/मूर्खपणाचे वाटतात. ज्या व्यक्तीला तातडीने सहकार्याची, उपचाराची गरज आहे तिला थाबंवण्याचे कारण काय? पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारांची गरज असताना अशा परिपत्रकामुळे रुग्णांना उपचार होण्यास विलंब होणार असे देखील सोमय्या यांनी पत्रात म्हटले आहे. एवढेच नाही तर प्रशासन मुंबईतील कोरोनाची स्थिती सुधरवण्याऐवजी अशी परिपत्रक काढून लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

First Published on: June 17, 2020 9:18 PM
Exit mobile version