‘आम्ही कामावर येवू, पण राहण्याची व्यवस्था करा’, कर्मचाऱ्यांची सरकारकडे मागणी!

‘आम्ही कामावर येवू, पण राहण्याची व्यवस्था करा’, कर्मचाऱ्यांची सरकारकडे मागणी!

मुंबई महानगरपालिका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक सेवेतील कामगारांना कामावर बोलावणाऱ्या मुंबई महापालिकेने आता सर्वच कर्मचाऱ्यांना सेवेत तात्काळ रुजू होण्याचे आदेश बजावले आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून महापालिकेचे सर्व कामगार, कर्मचारी सेवेत परतणार आहेत. त्यामुळे आम्ही सेवा करतो. त्यामुळे ज्याप्रमाणे महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची मुंबईतच राहण्याची व्यवस्था केली त्याचप्रमाणे बिगर अत्यावश्यसेवेतील कर्मचाऱ्यांचीही मुंबईत राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.

महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने, महापालिका कर्मचाऱ्यांच्या ५० टक्के उपस्थितीचे परिपत्रक रद्द करून १०० टक्के उपस्थितीचे सुधारीत परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, येत्या सोमवारपासून महापालिकेच्या सर्वच कामगार, कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू होणे बंधनकारक आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह बिगर अत्यावश्यक सेवेतील कामगारांची कोरोना संदर्भातील उपाययोजनांच्या कामांमध्ये सामावून घेतले जाणार आहे. त्यामुळे एकप्रकारे कोरोना विरोधातील मोहिमेत यासर्व इतर खात्यातील कामगारांची मदत घेतली जाणार आहे.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही कामावर यायला तयार आहोत. परंतु पुन्हा घरी जावून कुटुंबातील सदस्यांना तसेच सोसायटीतील रहिवाशी बाधित होणार नाही ना याची भीती आम्हाला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आज आम्ही सर्व काळजी घेवून घराबाहेर पडतो. तेव्हा घरातील सदस्य आणि शेजारीपाजारी, कामाला जाता,पण येताना कोरोनाचा विषाणू सोबत घेवून येवू नका असे बोलत असतात. आज कोरोनाच्या कामात आम्ही सक्रीय नसल्यामुळे याची भीती वाटत नाही. तरीही काळजी घेत असतो. पण आता जर कोरोनाच्या कामांमध्ये आमचा सहभाग नोंदवून घेतला जाणार असेल तर आम्हाला भीती आहेत. आम्ही घराबाहेर पडतो. पण कुटुंबातील सदस्य घाबरुन घराबाहेर पडत नाही. पण आमच्यामुळे त्यांना जर बाधा झाली तरी एवढी काळजी घेवून उपयोग काय असा सवाल कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. यापेक्षा महापालिकेने मुंबईत कार्यालयाच्या आसपास आमची राहण्याची व्यवस्था केल्यास जे काही होईल ते आम्हाला होईल. पण कुटुंब आणि शेजारी पाजारी तरी सुरक्षित राहतील, अशी भावना त्यांच्याकडून व्यक्त होताना दिसत आहेत.

जर अत्यावश्यक सेवेतील कामगार,कर्मचाऱ्यांची व्यवस्था होत असेल तर कोरोनाच्या मोहिमेत सक्रीय सर्वांचीच मुंबईत स्वतंत्र राहण्याची व्यवस्था करावी. काही कर्मचाऱ्यांची कौटुंबिक अडचण असू शकेल. घरात आई वडिल, सासू सासरे हे वयोवृध्द असतील, लहान मुले असतील आणि त्यांना त्यांच्याशिवाय आधारच नाही,अशा कर्मचाऱ्यांना प्रशासनाने सुट द्यायला हवी,अशी भावना व्यक्त होताना दिसत आहे. वाहतुकीची व्यवस्था आणि संसर्गाची शक्यता लक्षात घेता महापालिकेने सक्रीय असणाऱ्या सर्वच कामगार,कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना कार्यालयाजवळच राहण्याची व्यवस्था करावी. जेणेकरुन त्यांच्याकडून जास्त तास सेवाही करून घेता येईल.


हे ही वाचा – मंदार जोशी कॉलेजचं रूपांतर हॉस्पिटलमध्ये, हजार रूग्णांची होणार सोय!


 

First Published on: May 2, 2020 8:56 PM
Exit mobile version