फलाटाची उंची कधी वाढणार ?

फलाटाची उंची कधी वाढणार ?

मध्य रेल्वेच्या कल्याण ते आसनगाव कसारा लोहमार्गावरील अनेक रेल्वे स्थानकांवरील फलाटाची उंची कमी असल्याने लोकलमध्ये चढता व उतरताना प्रवशांना अक्षरशःजीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. रेल्वे स्थानकांवरील फलाटाची उंची कमी असल्याने लोकल व फलाटांमधील अंतरामध्ये प्रवासी पडल्याने अपघात होत आहेत.

रेल्वे स्थानकांवरील ही धोकादायक समस्या प्रवशांकरता प्रचंड चिंताजनक बनली आहे. प्रवाशांमध्ये जनजागृतीसाठी लोकलमधून प्रवास करताना रेल्वे प्रशासनाकडून गाडीतून उतरताना गाडीचे पायदान व फलाटामधील अंतरावर लक्ष ठेवा अशा सूचना केल्या जात आहेत. परंतु प्रत्यक्षात रेल्वे स्थानकावरील फलाटाची उंची वाढविण्याचे काम रेल्वे प्रशासन केव्हा पूर्ण करणार असा संतप्त सवाल मध्य रेल्वेचे प्रवासी विचारत आहेत. रेल्वे फलाटांच्या कमी उंचीमुळे लहान मुले, स्त्रिया, वृध्दांना लोकलमध्ये चढता उतरताना मोठी कसरत करावी लागत आहे.

First Published on: November 30, 2019 1:27 AM
Exit mobile version