भाईंदरमध्ये पत्नीला पतीनेच केले आत्महत्येला प्रवृत्त!

भाईंदरमध्ये पत्नीला पतीनेच केले आत्महत्येला प्रवृत्त!

प्रातिनिधिक फोटो

भाईंदरमध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला ठाणे न्यायालयाने शनिवारी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या गुन्ह्यात महिलेच्या जावेची मात्र निर्दोष सुटका करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी भाईंदरमध्ये हा प्रकार घडला होता.

१० जूलै २०१६ ला संजना तांगडे (नाव बदलले आहे) हीचा विनीत तांगडे (नाव बदलले आहे) याच्याशी विवाह झाला होता. भाईंदरमधील मुर्धाखाडी ब्राह्मण देवनगरमध्ये हे दांपत्य रहात होते. लग्नांनतर दोन महिने या दाम्पत्यामध्ये सर्वकाही सुरूळीत सुरू होते. त्यानंतर काही दिवसांनी या महिलेचा पती तिला त्रास देऊ लागला. आपण वेगळे राहूयात अशी भूणभूणही तो पत्नीकडे करू लागला. मात्र, लग्नाला चार महिने होत नाहीत, तोच पती वारंवार त्रास देत असल्याने अखेर २६ नोव्हेंबर रोजी मोनिका हिने आत्महत्या केली. तिच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पती संजय आणि जाऊ यांच्याविरुद्ध भाईंदर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गेले चार वर्ष ठाणे न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू होती. यावेळी एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. यानंतर संजयविरुद्ध आरोप सिद्ध झाला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताह्मणेकर यांनी संजयला भादंवी कलम ४९८ एमध्ये एक वर्षाचा कारावास, पाच हजार रुपये दंड, कलम ३०६ मध्ये तीन वर्षांचा कारावास, दहा हजार दंडाची शिक्षा ठोठावली.

First Published on: March 1, 2020 1:15 PM
Exit mobile version