मुंबई पोलीस आयुक्तपदी प्रथमच महिला अधिकारी?

मुंबई पोलीस आयुक्तपदी प्रथमच महिला अधिकारी?

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना मुदतवाढ न मिळाल्याने मुंबईला आता पोलीस दलाच्या प्रमुख पदी लवकरच नवा अधिकारी नियुक्त होणार आहे. मुंबईला नवा पोलीस आयुक्त कोण असणार याबद्दल बऱ्याच लोकांना उत्सुकता आहे. आताचे असणारे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना मुदत वाढ नसल्याने या पदासाठी राज्याच्या गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला आणि लाचलुचपत विभागाचे महासंचालक परमबीर सिंह यांच्या नावांच्या चर्चा सुरू आहेत.

जर पोलीस आयुक्तपदी राज्याच्या गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांचे नावावर शिक्कामोर्तब झाला तर रश्मी शुक्ला या मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्त असतील. गुप्तचर विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती होण्यापूर्वी त्या पुणे पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी संभाळली होती.

संजय बर्वे यांना पोलीस आयुक्तपदी मुदतवाढ द्यायची किंवा नाही यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. आता असणाऱ्या पोलीस आयुक्तपदी संजय बर्वे असून त्याचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट रोजी संपतोय. सुबोध जयस्वाल यांना राज्याच्या पोलीस महासंचालकपदी बढती मिळाल्यानंतर परमबीर सिंह मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत सर्वात पहिल्या स्थानावर घेतले होते. मात्र त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बर्वे यांची आयुक्तपदी नियुक्ती केली होती.

First Published on: August 16, 2019 12:08 PM
Exit mobile version