मास्क घालण्याचा कंटाळा करताय, मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची

मास्क घालण्याचा कंटाळा करताय, मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची

will mumbaikars be freed from penal action if they do not wear masks bmc gave instruction to marsha

मास्क घालण्याचा कंटाळा करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मुंबईत मास्क न घालणाऱ्या नागरिकांची दंडात्मक कारवाईपासून सुटका होण्याची शक्यता आहे. कारण मुंबई महानगर पालिकेने मास्क मार्शलांना दंडात्मक कारवाईची कडक अंमलबजवाणी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सध्या राज्यात आणि मुंबईत कोरोना स्थिती आटोक्यात येत आहे. त्यामुळे मुंबईत आता क्वीन अप मार्शलकडून मास्क न घातल्याने होणारी कारवाई शिथिल होणार आहे. मात्र प्रशासनाने नागरिकांना अद्याप मास्कमुक्तीची घोषणा केलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांना मास्क घालणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे सुरू ठेवावे लागेल.

दरम्यान मुंबईतील वॉर्डनिहाय मास्क मार्शलचे कंत्रात आता संपुष्टात येत आहे. त्यामुळे नव्या एजन्सीसाठी मुंबई महापालिकेने निविदा काढल्या आहेत. 24 वॉर्डातील 24 वॉर्डनिहाय एजन्सीऐवजी आता मुंबईत केंद्रीय एजन्सीमार्फत नवीन मार्शल नेमण्यात येणार आहेत. अशी माहिती समोर येणार आहे. मुंबईत विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून आत्तापर्यंत अंदाजे 120 कोटींची दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. दरम्यान विनामास्क फिरणाऱ्या लोकांकडून बेकायदेशीरपणे वसूल केलेला दंड परत करण्याच्या मागणीसाठी हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

याशिवाय केंद्रीय गृह मंत्रालयाने देखील आज कठोर निर्बंध शिथिल करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ३१ मार्चपासून देशभरात कोरोनाचे निर्बंध शिथिल होणार आहे. पण असे असले तरी मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.


Unlock India: केंद्राचा मोठा निर्णय; दोन वर्षांनंतर देशवासीयांची ३१ मार्चपासून कोरोना निर्बंधातून होणार सुटका

First Published on: March 23, 2022 7:24 PM
Exit mobile version