प्रवाशांच्या साथीने पोलीस स्टंटबाजांच्या मुसक्या आवळणार

प्रवाशांच्या साथीने पोलीस स्टंटबाजांच्या मुसक्या आवळणार

Arrest

रेल्वे प्रवासात दिवसेंदिवस वाढते स्टंट रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनीच आता प्रवाशांना आवाहन करायला सुरुवात केली आहेत. लोकलच्या दारात उभे राहून जीवघेणे स्टंट करणार्‍या मुलांना जर कोणी पाहिल्यास तत्काळ रेल्वे पोलीस हेल्पलाईनवर फोन करून याबाबत सूचना द्यावी, त्यामुळे पुढच्या स्टेशनवर त्याला पकडण्यास मदत होईल, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे. दोन दिवसांपुर्वी धावत्या लोकलच्या दरवाज्यात उभे राहून एक तरुण स्टंट करत होता. त्याचा टीकटॉकवरील एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि काल वसई पोलिसांनी त्याला नालासोपारा परिसरातून अटक केली आहे. आरोपी आवेद जावेद खान याने हा व्हिडीओ बनवला होता. त्यानंतर विरार रेल्वे पोलिसांनी एक पथक नेमून त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. पोलिसांनी त्याचा नंबर मिळवून त्याला संपर्क करायचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याने आपले ठिकाण पालघर असल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल केली. अखेर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला नालासोपारा परिसरातून अटक केली असून त्याला १५ दिवसांची पोलीस कोठडी आणि ८०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

पैसे आणि प्रसिद्धीसाठी ‘टिकटॉक’ चा वापर 

सध्या तरुण मुलांमध्ये प्रसिद्धीसाठी वापरण्यात येणारे टिकटॉक नावाच्या एका म्युझिकली अ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसत आहे. याचाच वापर करुन हे स्टंटमॅन अशाप्रकारचे व्हिडीओ बनवत आहेत. हे सर्व व्हिडीओ इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि टिकटॉकवर अपलोड करण्यात येतात. त्यामुळे प्रसिद्धीबरोबरच पैसे मिळत असल्यानेच हे जिवघेणे स्टंट करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वे लाईनपेक्षा हार्बर लाईनवर मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे स्टंट होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. चुनाभट्टी,वडाळा,कुर्ला आणि टिळक नगर या स्थानकांदरम्यान मुले असे स्टंट करत असून आतापर्यंत अनेकदा त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे.
-मच्छिंद्र चव्हाण,सहायक पोलीस उपायुक्त,रेल्वे पोलीस

First Published on: December 17, 2018 5:53 AM
Exit mobile version