लोकलमधून मंगळसूत्र पळवणारी महिला गजाआड

लोकलमधून मंगळसूत्र पळवणारी महिला गजाआड

प्रातिनीधीक फोटो

मुंबई : मुंबई लोकलमधून प्रवास करत असताना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. यावेळी नकळत होणार्‍या चोर्‍या आणि लुटमारांचे प्रमाण जास्त असते. पण महिला डब्यातुन चक्क गळ्यातील मंगळसूत्र हिसकावुन पळून गेलेल्या चोरट्या महीलेला बेड्या ठोकण्यात कुर्ला लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे या महीलेने थांबलेल्या लोकलमधल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र या महिलेने खेचून सरळ ट्रॅकवर उडी मारून पळ काढला होता. सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजवरून कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी चोरट्या महिलेच्या मुसक्या आवळल्या आहेत.सीता सोनवाणी असे या अट्टल चोरट्या महीलेचे नाव आहे.

कुर्ला परिसरात राहणारी ३५ वर्षीय महिला रोजी लोकलने प्रवास करत होती. प्रवासादरम्यान लोकल विक्रोळी स्थानकातील फलाट क्रमांक २ वर थांबली असता सीता सोनवाणी हिने संधी साधत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले असता मंगळसूत्र तुटून सोन्याचा तुकडा तिच्या हातात आला. सोन्याचा तुकडा घेऊन सीताने रेल्वे रूळावर उडी मारून पळ काढला.

या प्रकरणी कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विक्रोळी स्थानकातील सीसीटिव्ही फुटेजमध्ये घडलेला सर्व प्रकार कैद झाला होता.त्यानुसार कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी सीता सोनवाणीची ओळख पटवुन घेतली आणि तपास सुरु केला. सदर महीला ही अट्टल चोरटी असल्याने याधीही तिने चोर्‍या केल्या असल्याची प्राथमिक माहीती पोलिसांनी दिलेली आहे. मंगळसूत्र चोरुन पळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने प्रवास करतानासुद्धा प्रवाशांना सतर्क राहीले पाहीजे असे बोलले जात आहे.आरोपी महीलेने लंपास केलेल्या मंगळसूत्राचा तुकडा पोलिसांनी जप्त केला असुन फिर्यादी महीलेकडे तो सुपुर्द करण्यात आला आहे.

लोहमार्ग उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छींद्र चव्हाण, कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणाच्या पथकाने सदरची कारवाई केलेली आहे.

First Published on: October 19, 2018 4:21 AM
Exit mobile version