देशात महिला आणि जनावरे सुरक्षित नाहीत – जॉन अब्राहम

देशात महिला आणि जनावरे सुरक्षित नाहीत – जॉन अब्राहम

जॉन इब्राहिम

गर्भवती बकरीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच हरयाणा येथे समोर आली होती. अभिनेता जॉन अब्राहमने या घटनेची निंदा केली आहे. तसेच ‘अशा लोकांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे’ असे वक्तव्य केले आहे. आपल्या आगामी चित्रपटाच्या लाँचिंग पार्टी दरम्यान त्याने ही प्रतिक्रिया दिली. लैंगिक अत्याचारांमुळे या पीडित बकरीचा मृत्यू झाला. हरयाणातील मेवात जिल्ह्यात ही घटना घडली मात्र याची निंदा पूर्ण देशभरात करण्यात आली. या बकरीवर ८ जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली. पोलिसांनी तक्रार नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण प्राणी प्रेमी या बकरीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. ट्विटरवर #JusticeForGoat ही मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत लोकांनी आपला राग ट्विटरवर व्यक्त केला.

“या घटनेमुळे मी गोंधळलो. मी एक भारतीय आहे आणि आपल्या देशात महिला आणि प्राणी सुरक्षित नाहीत. असे कृत्य करणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. शिस्त बाळगल्याशिवाय या देशात काहीच बरोबर होऊ शकणार नाही. प्राणीमात्रांवर प्रेम करा अशी धर्म शिकवण देतो.”- जॉन अब्राहम

प्राणी आपल्या भावना बोलून व्यक्त करू शकतात म्हणून आपण त्यांच्या विरूद्ध होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे असंही त्याने म्हटलं आहे.

First Published on: July 30, 2018 10:16 PM
Exit mobile version