पब्जी खेळण्यास विरोध केला म्हणून महिलेला मारहाण

पब्जी खेळण्यास विरोध केला म्हणून महिलेला मारहाण

पब्जी खेळण्यास विरोध केला म्हणून महिलेला मारहाण

पोकेमॉन गो, ब्लू व्हेल यासारख्या गेम्सनी काही दिवसांपूर्वी मुलांना वेड लावलं होतं. सध्या पब्जी खेळाची या व्यसनात भर पडली आहे. मात्र सोसायटीत पब्जी खेळण्यास विरोध करणाऱ्या एका महिलेला जबर मारहाण केल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला याप्रकरणी सदर महिलेला शास्त्रीनगर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठाकुर्लीतील बालाजी नगर परिसरातील विशाल भोईर इमारतीमध्ये दिप्ती वेदांत राहतात. त्याच सोसायटीत राहणारे मनिष कदम यांची मुले ही जिन्यामध्ये पब्जी गेम खेळत बसायचे. यावरून दिप्ती यांनी त्यांना अनेकवेळा खेळण्यास मनाई केली होती. रविवारी रात्री ही मुले पब्जी गेम खेळत असतानाच दिप्ती यांनी गेम बंद केला. यावरून संतापलेल्या मुलांनी दिप्ती यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी दिप्ती यांनी रामगनर पोलीस ठाण्यात कदम यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

First Published on: July 29, 2019 7:48 PM
Exit mobile version