Vadapav Day: जाणून घ्या कसा झाला ‘मुंबईच्या वडापावचा जन्म’

Vadapav Day: जाणून घ्या कसा झाला ‘मुंबईच्या वडापावचा जन्म’

मुंबई आणि मुंबईचा वडापाव यांच नातं काही औरच आहे. दिवसरात्र एक-एक सेकंदावर धावणारी मुंबई आणि या मुंबईच्या खिशाला परवडणारा तसेच पोट भरणारा पदार्थ म्हणजे अवघा १० रुपयांचा हा मुंबईचा वडापाव. गरिब- श्रीमंत अनेक लोकांच्या पोटाची भूक भागवणारा तसेच मुंबईची जान असणारा हा वडापाव. वडापाव म्हटलं की, नकळत तोंडाला पाणी सुटतंच… कोणत्याही मौसमात अगदी हवाहवासा वाटणारा, जीभेचे चोचले पुरविणाऱ्या या वडापावचा आज जागतिक दिवस आहे…

असा झाला ‘वडापावचा जन्म’

दादर स्थानकाबाहेर १९३३ साली अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थांच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला असे मानले जाते. पुर्वीच्या मुंबईकरांच्या सांगण्यानुसार याच काळात दादरमध्येच सुधाकर म्हात्रेंचा वडापाव देखील सुरू करण्यात आला होता.

वडापावचा जन्म झाला तेव्हा तो प्रत्येक सामान्य माणसांच्या खिशाला परवडेल अशाच किंमतीत विकला जायचा. त्यांची किंमत होती फक्त १० पैशे. मात्र आज अगदी १० रूपयांपासून ते मोठ्याला शॉपमध्ये हाच वडापाव ८० ते १०० रूपयांपर्यंत ही विकला जातो. मुंबईतील दादर, परळ, गिरगाव या ठिकाणी कालांतराने मराठमोठ्या उपहार गृहांची संख्या वाढल्याने खऱ्या अर्थाने वडापावला हक्काचे ठिकाण मिळाले. मुंबईतील दादर, लालबाग, परळ आणि गिरगांवमध्ये असणाऱ्या गिरणी कामगारांमुळे हा साधा पदार्थ ‘मुंबईचा प्रसिद्ध वडापाव’ ठरला.

मुंबईतील वडापावचा वेगळेपणा हिच त्याची ओळख

बदलत्या जीवनशैलीनुसार स्पर्धा ही वेगाने वाढू लागली. मुंबईमध्ये मिळणाऱ्या हा साधा वडा-पाव यामध्ये नाविन्य आणण्यासाठी त्यावर वेगवेगळे प्रयोग करण्यात आले आहे. हेच त्याचे नाविन्य वडापावची ओळख बनली आहे.

मुंबईत असणाऱ्या किर्ती महाविद्यालयाच्या बाहेरील वडापाववाल्याने वड्याबरोबर बेसनाचा चुरा देण्यास सुरूवात केले तर ठाण्यामध्ये मिळणारा कुंजविहारने पहिल्यांदा वड्या सोबत मोठा पाव दिला जाऊ लागला. या मोठ्या आकाराच्या वडापावमुळे कुंजविहारच्या वडापावला जम्बो वडापाव अशी ओळख मिळून तो प्रसिद्ध झाला. तर कल्याणमध्ये मिळणाऱ्य़ा वझे कुटुंबाने सुरु केलेला वडापावच्या दुकानामध्ये वडापाव ग्राहकांना खिडकीमधून दिला जायचा, त्यामुळे तो वडापाव खिडकी वडापाव या नावानेच कल्याणमध्ये लोकप्रिय झाला.

First Published on: August 23, 2019 10:32 AM
Exit mobile version