विठ्ठलवाडी येथे तरुणाचा लोकलच्या धडकेत मृत्यू

विठ्ठलवाडी येथे तरुणाचा लोकलच्या धडकेत मृत्यू

तरुणाचा लोकलच्या धडकेत मृत्यू

उल्हासनगरातील शांतिनगर परिसरात राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाचा लोकलच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. कुशांत खैरनार, असे लोकलच्या धडकेत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. विठ्ठलवाडी येथे रेल्वेने सुरु केलेल्या पुलाचे काम अर्धवट सोडले आहे. वारंवार पाठपुरावा करून देखील हे काम सुरु करण्यात आलेले नाही. जर हा पुल बांधला असता तर कुशांतचा बळी गेला नसता, असे बोले जात आहे. त्यामुळे कमवता आधार गमावलेल्या कुशांतच्या आईवडिलांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केली आहे. रेल्वेच्या कामचुकार पणामुळे हा बळी गेला आहे असून आई वडिलांचा एकुलता एक आधार हिरावून घेतलेल्या रेल्वेने तरुणाच्या आईवडिलांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.

आई – वडिलांनी एकुलता एक मुलगा गमावला

कुशांत हा त्याच्या आईवडिल आणि लहान बहिणीसोबत उल्हासनगरातील शांतिनगरमध्ये राहत होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने आणि त्यात बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी कुशांत हा ऐरोलीमध्ये एका खाजगी कंपनीत कामाला जात होता. मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कुशांत कामाला जात असताना अंबरनाथच्या दिशेकडे जाणाऱ्या लोकलच्या धडकेत कुशांत मृत्यू झाला.
शांतिनगर, चोपडा, मिनाताई ठाकरे नगर, डॉल्फिन रोड येथील हजारो नागरिक रेल्वेने प्रवास करण्यासाठी शेवटच्या टोकाच्या दिशेने प्लॅटफार्मवर रेल्वे क्रॉसिंग करून जातात. त्यामुळे यादिशेला  पुल बांधण्याची मागणी केली होती. मात्र, कोळसेवाडीच्या दिशेने  पुलाचे काम पूर्ण करणाऱ्या रेल्वेने शांतिनगरच्या दिशेचे काम अर्धवट सोडले आहे. काम पूर्णत्वास आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. पण त्याकडे रेल्वे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला आहे. हा पुल बांधला असता तर कुशांतचा बळी गेला नसता. त्यामुळे कमावता आधार गमावलेल्या कुशांतच्या आईवडिलांना आर्थिक मदत करावी अशी मागणी असल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे.
First Published on: July 31, 2019 9:20 AM
Exit mobile version