दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

बेस्टच्या बसने महिलेला चिरडले

बोरिवली येथे भरवेगात जाणार्‍या कारची बाईकला धडक लागून झालेल्या अपघातात अंकुश अशोक घोरपडे या २७ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अपघाताची नोंद करुन आरोपी कारचालक रुपेश विनय पाठक (२५) याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने जामिनावर सोडून दिले.

कसा घडला अपघात

हा अपघात बुधवारी दुपारी बारा वाजता बोरिवलीतील पश्चिम दुतग्रती महामार्गावरील नॅशनल पार्क फ्लॉयओव्हर ब्र्रिजवरील दक्षिण वाहिनीवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अंकुश हा कांदिवलीतील ठाकूर कॉलेजजवळील नवजीवन सोसायटी इस्टेटमध्ये राहत होता. बुधवारी दुपारी बारा वाजता तो त्याच्या बाईकवरुन नॅशनल पार्क फ्लॉयओव्हर ब्रिजवरुन जात होता. यावेळी तेथून भरवेगात जाणार्‍या सुझुकी कारने त्याला मागून धडक दिली. त्यात तो बाईकवरुन खाली पडल्याने गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघाताची माहिती मिळताच कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी अवस्थेत अंकुशला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अंकुशच्या भावाच्या तक्रारीवरुन कस्तुरबा मार्ग पोलिसांनी कारचालक रुपेश पाठक या तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. मात्र हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली

First Published on: November 1, 2018 8:31 PM
Exit mobile version