एनएमएमटीच्या (Nmmt Bus) गणेशोत्सव विशेष सेवेला अल्प प्रतिसाद

एनएमएमटीच्या (Nmmt Bus) गणेशोत्सव विशेष सेवेला अल्प प्रतिसाद

नवी मुंबई- गणेश भक्तांना मुंबईतील गणरायाच्या दर्शनासाठी तसेच बेलापूर ते पनवेल हार्बर मार्गावरील ब्लॉक यादरम्यान रात्रीच्या वेळी पनवेल-दादर आणि पनवेल ते बेलापूर मार्गावर (Ganeshotsav Special Bus Service) नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्यावतीने विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र आतापर्यत या बस सेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत दररोज ५० टक्के प्रवाशांनी प्रवास केला (50 percent of the passengers traveled) आहे. त्यामुळे त्या मार्गावर एनएमएमटीचे उत्पन्न देखील घटले आहे.

पुण्याप्रमाणे मुंबईमध्ये देखील विविध ठिकाणी श्री गणरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळते. ठाणे, नवी मुंबई, मुंबई, पनवेल, परिसरातील गणेशभक्त आपल्या लाडक्या गणरायाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी करत असतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात दिवसासह रात्रीही मुंबई सुरूच असते. विशेषतः नोकदार वर्ग सर्व कामकाज आटपून रात्रीच्या वेळी गणरायाच्या दर्शनासाठी धाव घेत असतात. अगदी पहाटेपर्यंत भाविक रांगेमध्ये उभे राहून बाप्पाचे दर्शन घेतात. रात्रीच्या वेळी देखीळ गणेश भक्तांना सुखकर प्रवास करता यावे यासाठी एनएमएमटीने पनवेल ते दादर (हिंद माता) या मार्गावर २० ते २७ सप्टेंबरपर्यंत रात्री ९.३० ते पहाटे ३.३० वाजेपर्यत विशेष बस सेवा चालू केली. तसेच रात्री उशिरा येणार्‍या उपनगरीय गाड्यांमधील प्रवाशांच्या सोयीसाठी बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान ३२ विशेष बससेवा सुरू केल्या.

या मार्गावर बस सेवा देण्यासाठी बसची कमतरता होती. केवळ प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून या मार्गवर बससेवा सुरू केली होती. मात्र या दोन्ही मार्गवर प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असून अवघ्या ५० टक्के प्रवाशांनी याचा लाभ घेतला आहे. त्यामुळे ज्याठिकाणी एका प्रवासी फेरीत ८ तासात ५ ते ६ हजार रुपये उत्पन्न अपेक्षित होते. मात्र केवळ दीड ते दोन हजार हाती पडले आहे, अशी माहिती परिवहन उपक्रमाचे मुख्य वाहतूक अधिकारी उमाकांत जंगले यांनी दिली. एरव्ही या मार्गावर एनएमएमटीच्या १०३ क्रमांकाच्या बस नियमित धावतात. त्याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतो.

First Published on: September 27, 2023 4:44 PM
Exit mobile version