खाडी किनारी (navi mumbai creek) खारफुटी स्वच्छता मोहीम

खाडी किनारी (navi mumbai creek) खारफुटी स्वच्छता मोहीम

नवी मुंबई-
’इंडियन स्वच्छता लीग २ अंतर्गत लोकसभाग सहभागातून विविध उपक्रमांचे आयोजन (Nmmc Organizing activities) पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले आहे. त्यानुसार खाडी किनार्‍यावर पाच ठिकाणी राबविण्यात आलेल्या खारफुटी स्वच्छता मोहिमेत (Mangrove cleanup campaigns)  १०३०० हून अधिक नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल होते.

दिल्ली पब्लिक स्कूल जवळील खाडी किनारा, तलावा सागरी किनारा करावे, टी एस चाणक्य करावे किनारा, शिवमंदिर (डोलावा) किनारा, सारसोळे जेट्टी येथे झालेल्या स्वच्छता मोहिमेत युवकांची व विशेषत्वाने युवतींची संख्या लक्षणीय होती.

या खारफुटी स्वच्छता मोहिमेत तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज नेरूळ, सरस्वती कॉलेज सीबीडी बेलापूर, विद्या प्रसारक कॉलेज सीबीडी बेलापूर, डी वाय पाटील कॉलेज बेलापूर, एनआरआय कॉम्प्लेक्स पदाधिकारी, सूर्योदय बँक कर्मचारी बेलापूर, एस व्ही पटेल कॉलेज सीवूड्स, एस.एस.हायस्कूल सीवूड्स, ज्ञानदीप सेवा मंडळ विद्यालय करावे, एसआयईएस कॉलेज नेरूळ, टी.एस.चाणक्य युनिव्हर्सिटी करावे, स्टर्लिंग कॉलेज फार्मसी नेरूळ, टिळक कॉलेज नेरूळ, एस.के.कॉलेज नेरूळ, आयसेफ सामाजिक संस्था, डिवाइन फाऊंडेशन, पोलीस अकादमी नेरूळ, सागरी सीमा मंच, मॅन्ग्रुव्हज सोल्जर समूह, इंदिरा गांधी कॉलेज घणसोली, टिळक कॉलेज घणसोली, छबी फाऊंडेशन, जयश्री फाऊंडेशन अशा विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, एनसीसी व एनएसएस विद्यार्थी, शिक्षक तसेच स्वच्छताप्रेमी नागरिक या खारफुटी स्वच्छता मोहिमेत अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते.

स्वच्छतेप्रमाणेच सागरी किनारपट्टी स्वच्छता ही देखील अत्यंत महत्त्वाची असून या खारफुटी स्वच्छता मोहिमेद्वारे सागरी किनारा स्वच्छतेचे महत्व विविध संस्था प्रतिनिधी, युवकांनी व नागरिकांनी अधोरेखित केले. यावर्षी ‘इंडियन स्वच्छता लीग 2’ चे घोषवाक्य ‘कचऱ्याविरोधातील युवकांची लढाई’ अर्थात (YouthVsGarbage) हे असून या खारफुटी स्वच्छता मोहिमेत विद्यार्थी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत ही संकल्पना सार्थ केली.

First Published on: September 25, 2023 9:12 PM
Exit mobile version