१११ प्रभागात (cleanliness in Wards) स्वच्छतेसाठी श्रमदान

१११ प्रभागात (cleanliness in Wards) स्वच्छतेसाठी श्रमदान

नवी मुंबई-
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांनी स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत येत्या १ ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशातील नागरिकांनी आपापल्या परिसरात एकत्रित येऊन एकाच वेळी एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार नवी मुंबईतही पालिकेच्या माध्यमातून आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार आठ नोडमधील १११ प्रभागात (cleanliness in Wards) प्रत्येकी २ याप्रमाणे २२२ हून अधिक ठिकाणी ही स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाच्या दृष्टीने मौल्यवान सूचना केल्या आहेत. त्यास अनुसरुन नियोजन करीत संपूर्ण नवी मुंबई शहर पुन्हा एकवार स्वच्छतेच्या उद्दिष्टाने प्रेरीत होऊन झळाळणार आहे.

स्वच्छताप्रेमी नागरिक १ ऑक्टोबर रोजी प्रभागात एकत्र येऊन सकाळी १० वाजता एकाच वेळी, एक तास परिसर स्वच्छता करणार आहेत.यामध्ये प्रभागातील प्रमुख जागा, बाजार, रेल्वे स्टेशन, बस डेपो, चौपाटी, पर्यटन स्थळे, उद्याने, नाले परिसर, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, आरोग्य केंद्रे अशा विविध ठिकाणी नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. या प्रत्येक स्थळाकरिता समन्वयक असणार आहे.

प्रत्येक नागरिकाने स्वच्छता ही आपली जबाबदारी मानून २२२ ठिकाणांपैकी आपापल्या घराजवळील स्वच्छता मोहिमेमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे आणि‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे नवी मुंबईचे ध्येयवाक्य साध्य करण्यासाठी शहर स्वच्छतेसाठी एकत्रित योगदान द्यावे.
-राजेश नार्वेकर, आयुक्त-नमुंमपा.

First Published on: September 26, 2023 9:05 PM
Exit mobile version