मोरबे जलपूजन (Morbe dam) प्रकरण अधिकार्‍यांना भोवले!

मोरबे जलपूजन  (Morbe dam) प्रकरण अधिकार्‍यांना भोवले!

बेलापूर-नवी मुंबई महापालिका (Nmmc Commissioners) आयुक्तांची कोणतीही परवानगी न घेता मोरबे धरणावर माजी खा.संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक आणि इतर माजी नगरसेवक यांनी जलपूजन (water worship) केले. याप्रकरणी पाणी पुरवठा विभागाशी संबंधित अभियंत्यांना खुलासा सादर करण्याची नोटीस देण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली.

महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणाने १०० टक्के पातळी गाठल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पुर्व माहिती देऊन लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांच्या उपस्थितीत जलपूजन करण्याची पालिकेची प्रथा आहे. मात्र असा नियम असताना प्रतिबंधित असलेल्या मोरबे धरणाच्या अंर्तगत क्षेत्रात प्रवेश करुन माजी खासदार संजीव नाईक आणि माजी महापौर सागर नाईक त्याच प्रमाणे इतर माजी नगरसेवकांनी जलपूजन केले.केवळ प्रसिध्दीसाठी हा प्रकार करुन पालिकेच्या नियमांना बगल दिली आहे.

या गंभीर प्रकरणी संबंधीतावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, शहर प्रवक्ता व कामगार नेते रविंद्र सावंत, एनएसयुआयचे अध्यक्ष मल्हार देशमुख, माजी नगरसेविका मीरा पाटील, जिल्हा सचिव विद्याताई भांडेकर आदी पदाधिकार्‍यांनी काल पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या दालना बाहेर ठिय्या आंदोलन केले होते. त्यावर आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित सर्व अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उत्तर आल्यावर पुढची योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे.

First Published on: September 26, 2023 9:21 PM
Exit mobile version