तुम्ही पदवीधर (Graduate) आहात…उद्यापासून करा मतदार नोंदणी!

तुम्ही पदवीधर (Graduate) आहात…उद्यापासून करा मतदार नोंदणी!

 

राज्यात पुढील वर्षी होणार्‍या मुंबई शिक्षक (Mumbai Teacher) आणि मुंबई, कोकण पदवीधर मतदार संघाच्या (Graduated from Mumbai, Konkan) निवडणुकीसाठी मतदार नाव नोंदणी मोहिम सुरू करण्यासंदर्भात भारत निवडणुक आयोगाने कार्यक्रम जाहिर केला आहे. ३० सप्टेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत नव्याने मतदार यादी तयार करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तुम्ही मुंबई व कोकण विभागात वास्तव्यास असाल आणि जर १ नोव्हेंबर २०२३ पूर्वी किमान ३ वर्षे म्हणजेच ऑक्टोबर २०२० पर्यंत भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समतुल्य पदवी प्राप्त केलेले पदवीधर असाल तर मग मतदार नोंदणीसाठी तुम्ही वेळेत करा अर्ज.

मुंबई-कोकण पदवीधर मतदार नोंदणी अभियान आपल्या भागातील सर्व क्षेत्रातील पदवी प्राप्त केलेल्या तरूण तरुणींनी आपली पदवीधर मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कोकण आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी यांनी केले आहे. शनिवार ३० सप्टेंबरपासून सुरु होणारी नाव नोंदणी ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत असणार आहे.३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान होणार आहे.अधिक माहितीसाठी मुख्य निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/forms.aspx ला भेट द्या आणि नोंदणी अर्ज मिळवा आणि अर्ज करुन व्हा पदवीधर मतदार.

आवश्यक कागद पत्रे

महत्वाचे: पदवीधर मतदारसंघाची मतदार नोंदणी करताना व्यक्तीला प्रत्यक्ष जाऊन नोंदणी अर्ज जमा करायचा आहे, एकगठ्ठा नोंदणी किंवा सरकारी कार्यालयाच्या व्यतिरिक्त कोणत्याही स्वरुपात आयोजित करण्यात आलेल्या कॅम्प मधून होणार नाही याची नोंद घ्यावी.

First Published on: September 29, 2023 6:39 PM
Exit mobile version