एसआरएस ग्रुपच्या वतीने उद्या दांडीया, गरबा नाईट

एसआरएस ग्रुपच्या वतीने उद्या दांडीया, गरबा नाईट

नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून नाशिकमधील विविध सांस्कृतिक मंडळे, संस्था आणि महिला ग्रुप्सच्या वतीने यंदा गरबा रास दांडीयाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील एसआरएस गुु्रपच्या वतीनेही नक्षत्र लॉन्स येथे गरबा डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने वर्कशॉपदेखील घेण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी तरूण, तरूणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून या स्पर्धेनिमित्त आकर्षक बक्षिसेही जिंकण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे. दैनिक आपलं महानगर, माय महानगर लाइव्ह, माय महानगर मानिनी माध्यम प्रायोजक असलेल्या या स्पर्धेत कलाकारांना भेटण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.

गरबा रास दांडीया या नृत्यप्रकाराची समाजात लोकप्रियता आहे आणि युवापिढीत या नृत्याचे आकर्षण आहे. शारदीय नवरात्र काळात विविध संस्था किंवा संयोजन संस्था मोकळ्या पटांगणावर दांडिया नृत्याचे आयोजन करतात. नाशिकच्या एसआरएस महिला ग्रुपच्या वतीनेही ३० सप्टेंबर रोजी गंगापूररोडवरील नक्षत्र लॉन्स येथे सायंकाळी ६ वाजता गरबा रास दांडीयाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार असून, याकरीता एसआरएस ग्रुपच्या वतीने दांडीया वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्कशॉपमध्ये गरबाचे विविध प्रकार जसे की, घूमर, भवाई, दांडीया रास, डिस्को गरबा नृत्याचे धडे दिले जात आहे.

या वर्कशॉपला तरूणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, स्पर्धेतील विजेत्यांना ११ हजार रूपयांची पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय विविध आकर्षक भेटवस्तूही देण्यात येणार आहे. या महोत्सवाला तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं फेम पूनम देशमुख, ग्लोबल युनिर्व्हसल क्वीन पूनम बिरारी, उधाण गुु्रपचे अध्यक्ष जगदीश बोडके, कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सुनीता मोडक आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौघुले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नाशिककरांनी या दांडीया गरबा रास कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन एसआरएस गु्रुपच्या संयोजिका रोशनी राठी, सई संघई, साधना गिलालकर यांनी केले आहे.

First Published on: September 29, 2022 12:51 PM
Exit mobile version