Navratri fashion: नवरात्रोत्सवात फॉलो करा अभिनेत्रींचे नवरंगांचे आउटफिट्स

Navratri fashion: नवरात्रोत्सवात फॉलो करा अभिनेत्रींचे नवरंगांचे आउटफिट्स

Navratri fashion: नवरात्रोत्सवात सुंदर दिसण्यासाठी फॉलो करा अभिनेत्रींचा स्टायलिस्ट आउटफिट्स

नवरात्रोत्सवात तरुणी आणि महिलांना साड्या नेसण्याची भारी आवडत असते. त्यामुळे नऊ दिवसांसाठी विविध रंगांचा साड्या आवर्जून घालतात. अशा दिवसांमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींचा साडीतील लूक कायमच चर्चेत असतो. मात्र तुम्ही जर नियमित साडी नेसणाऱ्यांपैकी नसाल तर बॉलिवूड अभिनेत्रींचे साडीतील लूक कॅरी करत नवरात्रोत्सवात तुम्ही अधिक सुंदर दिसू शकता. या खास सणानिमित्त काही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींचे फेमस साडी लूक तुमच्यासाठी आणले आहेत.

पहिला दिवस -पिवळा रंग

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी पिवळ्या रंगाला महत्त्व आहे. पिवळा रंग हा मांगल्याचे प्रतिक असून अनेक शुभ कार्यामध्ये त्याला स्थान असते. त्यामुळे या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची साडी, सूट लेहंगा असं कपडे परिधान करत अधिकच आकर्षक दिसू शकता.

दुसरा दिवस- हिरवा रंग

नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी हिरव्या रंगाला महत्त्व आहे. हिरव्या रंगात अनेक शेड उपलब्ध असतात. त्यामुळे यातील कोणत्याही शेडचे कपडे तुम्ही परिधान करु शकता.

तिसरा दिवस- राखाडी (ग्रे)

ग्रे कलर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाचा रंग आहे. अनेकांकडे या रंगाचे कपडे असतात. हा रंग जरी फिका वाटत असला तरी तो चांगल्या प्रकारे कॅरी केल्यास तुम्ही अधिकच आकर्षक दिसू शकता.

चौथा दिवस- नारंगी

चौथ्या दिवसाचा रंग नारंगी आहे. हा रंग उन्हाळ्याचे प्रतिनिधित्व करतो आणि नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नारंगी रंगाचे कपडे घालायचे असतात.

पाचवा दिवस- पांढरा

पंचमीच्या पाचव्या दिवशी, सोमवारी सर्वशक्तिमान देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी पांढरे रंगाचे कपडे घालावे. पांढऱ्या रंगाचे कपडे सिंपल, सोबर आणि पर्सनॅलिटीला अधिकच खुलून दिसतात.

सहावा दिवस – लाल

षष्ठीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी आपल्या नवरात्रोत्सवासाठी लाल रंग परिधान करा. लाल रंगातही अनेक शेडचे कपडे अव्हेलेबल असतात. लाल रंगाचे वन शोल्डर जंपसूटही तुम्ही कॅरी करु शकता.

सातवा दिवस- रॉयल ब्लू

अनेक स्किन टोनवर रॉयल ब्लू रंग उठून दिसतो. हा नवरात्रोत्सवाचा सातवा रंग आहे. या रंगाचा लेहंगा, साडी, सूट, शरारा ट्राय करु शकता.

आठवा दिवस – गुलाब

नवरात्रोत्सवाचा आठवा रंग महिलांचा फेव्हरेट रंग आहे. या रंगाचे कपडे महिलांकडे असतातचं.

नववा दिवस- जांभळा

नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवसाचा रंग जांभळा आहे. मात्र या रंगाचे शेड आणि कॅम्बिनेशन व्यवस्थित करत तुम्ही अधिकच सुंदर दिसू शकता.


 

First Published on: October 6, 2021 8:36 PM
Exit mobile version