सांडव्यावरील देवी मूर्तीचे होणार संवर्धन

सांडव्यावरील देवी मूर्तीचे होणार संवर्धन

नाशिक : आजवर अनेक महापूर पाहिलेल्या सांडव्यावरील देवीच्या मूर्तीचे मिट्टी फाउंडेशनने पुढाकार घेत शास्त्रशुद्ध पद्धतीने संवर्धन केले. गोदाकाठी असलेल्या मूर्तीवर पाणी, आर्द्रता, धुलीकण व आम्ल यांच्या थेट संपर्काने झीज होत होती. ही झीज रासायनिक प्रक्रियेमुळे रोखण्यास मोठी मदत होणार आहे.

गोदावरी नदीला आलेल्या पुरावेळी ही मूर्ती पूर्ण पाण्यासाठी जाते. त्यामुळे पूर ओसरल्यानंतरही मूर्तीच्या गाभ्यापर्यंत ओलावा कायम असतो. त्यामुळे दरवर्षी वेळोवेळी या मूर्तीचे जतन व संवर्धनाचे काम सुरू असते. मात्र, यंदा या मूर्तीवर कोणत्याही प्रकारचे हानिकारक व कृत्रिम पदार्थांचे लेपन न करता अत्यंत बारकाईने अभ्यासपूर्ण रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही एम-सील, एरल्डाईट अथवा तत्सम केमिकलचा वापर केलेला नाही हे विशेष. संवर्धनाच्या या प्रक्रियेमुळे वातावरणातील ज्या घटकांच्या परिणामामुळे मूर्तीची झीज होते, ती झीज होण्याची प्रक्रिया रोखण्यास मदत होणार आहे. या प्रक्रियेनंतर देवीची मूर्ती अधिक प्रभावी दिसू लागली आहे.

मूर्तीचे संवर्धन करणे व भविष्यासाठीची त्या मूर्तीची झीज थांबवणे या साठी आम्ही कायम आग्रही आहे. त्यासाठी आम्ही हे जतन- संवर्धनाचे पाऊल उचलले. मिट्टी फाउंडेशनने या कामी सहयोग केला. त्यासाठी त्यांचे विशेष आभार. : मधुसूदन त्रिंबक राजेबहादूर

सवर्धंनाच्या प्रक्रियेमुळे मूर्तीच्या मूळ गाभ्यापर्यंत जाऊन पक्केपणा देणार्‍या रसायनांचा वापर करण्यात आला. त्यामुळे गॅस्ट्रिक क्रिएशन संथ होऊन मूर्तीला अधिक बळकटी मिळणार आहे. हे काम १२ दिवस चालले. : मयूर शांताराम मोरे, जतन व संवर्धन तज्ज्ञ तथा अध्यक्ष, मिट्टी फाउंडेशन

First Published on: September 30, 2022 1:53 PM
Exit mobile version