पोलीस आयुक्तलयातील ८० टक्के गुन्हे उघडकीस

पोलीस आयुक्तलयातील ८० टक्के गुन्हे उघडकीस

भाईंदर :- मीरा -भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना होऊन दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. मीरा- भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तलयाचा पदभार पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्याकडे असून त्यांनी पदभार स्विकारल्या पासून लोकांच्या समस्या दूर करणे व शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्याला प्रथम प्राधान्य दिले आहे. यामुळे शहरातील गुन्हेगारीवर देखील आळा बसला असून आयुक्तालयातील उघड गुन्ह्याचे प्रमाण ८० टक्के झाले आहे. २०२२- २३ या वर्षात खुनाचे दाखल असणारे सर्व गुन्हे १०० टक्के उघडकिस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस आणले जात असल्यामुळे शहरातील गुन्हेगारी वर आळा बसला आहे.

पोलीस आयुक्तलयाच्या अंतर्गत उत्तम कामगिरी करणार्‍या सर्व पोलीस अधिकारी व अमलदार यांना आयुक्तालयात प्रत्येक महिन्यात होणार्‍या आढावा बैठकीत सन्मानित करण्यात येते. मीरा-भाईंदर, वसई विरार शहरातील क्लिष्ट गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केल्यामुळे अनेक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. मीरा-भाईंदर व वसई- विरार पोलीस आयुक्तालयात २०२१ या वर्षात

खुनाचे ५२ गुन्हे दाखल होते. त्यापैकी ४७ गुन्हे उघड़कीस आले होते. उघडकीस आणल्या जाणार्‍या गुन्ह्यांचे प्रमाण ९० टक्के होते. तर २०२२-२३ मध्ये खुनाचे १०० टक्के गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले. २०२२-२३ या वर्षात एकूण २७ जणांना तडीपार करण्यात आले आहे .तर २०२२ मधील खून- दरोडा या गुन्ह्यात ३७ जणांना मोका लावण्यात आला आहे. खून, विनयभंग, अपहरण, दुखापत व चैन चोरी आणि इतर जबरी चोरी यांचे २०२१ व २०२२व २०२३ वर्षा मधील दाखल व उघड गुह्यांचे प्रमाण पाहता सर्वात अधिक गुन्हे उघडकिस आणण्यात आले आहेत. आयुक्तलयाच्या हद्दितील १७ पोलीस ठाण्यामध्ये उघड गुह्यांचे प्रमाण ८० टक्के आहे.

First Published on: June 6, 2023 10:05 PM
Exit mobile version